काही सुटे शेर

Submitted by सुशांत खुरसाले on 9 August, 2013 - 23:24

शिस्तीस आज ठोकू यारो सलाम थोडा
बेबंद वागण्याला घालु लगाम थोडा

उगा कशाला नजरेवरती नजर भिडावी
सरळ चालली नाव आमुची बुडून जावी..!

नाते नसून काही बघतो तुझ्याकडे मी
थोडातरी जिवाला आधार पाहिजे ना..?

प्रत्येक चेहर्याला अपुलेच मानता मी
ह्रदयात चांदण्यांची गर्दी बरीच झाली!

टाकण्याची गरज नाही रंग कुठलाही तुला
वेदनांचा कात टाकुन 'पान' गझलेचे खुले!

तू नको करु ना तुझिया बहराचा गाजावाजा..
मी तर वसंत माझा शोधून ठेवला आहे

असे हे भाळणे नाही बरे मज सांगते दुनिया
तिचे गांभीर्यही ज्याने मला दिलखेच वाटावे.!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळे आवडले
मी तर वसंत माझा शोधून ठेवला आहे << इथे अडखळलो मात्रा बरोबर असाव्यात बहुधा यतिस्थानापाशी जरा गड्दबड झाली असावी ...(मोजले नाही चू.भू.द्या.घ्या )

धन्यवाद वैभव आणि अरविंदजी !

वैभवजी, त्या शेरातल्या उला मिसर्यात थोडा बदल केलाय ..मात्रा जास्त आहेत अजूनही.. अजून चपखलसुचल्यास बदल करतो .

धन्यवाद!

तू नकोस मारू बाता तुझिया बहराच्या वेडे
हा वसंत तर माझा-मी शोधून ठेवला होता / हेरून ठेवला होता

नाते नसून काही बघतो तुझ्याकडे मी
थोडातरी जिवाला आधार पाहिजे ना..?

व्वा!

साधर्म्य असलेला एक माझा शेर सहज देत आहे,

जाहली नुकतीच ज्यांची तोंडओळख
वाट्ती तेही मला आधार हल्ली

विदिपा ,

जाहली नुकतीच ज्यांची तोंडओळख
वाट्ती तेही मला आधार हल्ली
छान शेर.

सर्वांचा आभारी आहे.

सग्गळे आवडले सुशांत, ले.शु. 'सुट्यां'ना अडकवून टाकण्यासाठी पूर्ण गझलांमध्ये.
जावेदजींच्या तरक़श संग्रहात मध्येमध्ये असे सुटे शेरही पेरलेत,अत्यंत परिणामकारकतेने, ते आठवलं.

धन्स.!