प्रेरणा आणि स्फुर्ती देणारे लेख, भाषणे, ध्वनीचित्रफितींचा संग्रह

Submitted by विजय देशमुख on 8 August, 2013 - 22:21

काल संदिप माहेश्वरीचा यु-ट्युबवरचा video बघितला आणि यापुर्वीही अनेक असेच व्हिडीओ बघितल्याचे आणि लेख वाचल्याचे आठवले. आपण बरेचदा असे लेख वाचतो, व्हिडीओ बघतो, भाषणं ऐकतो, पण रोजच कानावर आदळणार्‍या फालतू बातम्यांच्या गदारोळात हे प्रेरणादायी विचार हरवुन जातात की काय अस वाटायला लागतं.

पुन्हा एकदा कधीतरी 'अग्निपंख'ची आठवण येते, स्टिव्ह जॉब्जचं भाषण आठवते किंवा माशेलकरांचा लेख आठवतो, पण मग लिंक शोधा, सपडली तर ठिक, नाहीतर उत्साह मावळतो. तुम्हाला कोणते लेख असे उल्लेखनीय वाटतात? अश्या लिंक्स एकत्र एका धाग्यावर असतील तर .......... ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कल्पना चांगली आहे Happy

शिर्षक थोडे बदलणार का?

'प्रेरणा आणि स्फुर्ती देणारे लेख/भाषण यांचे संकल' असे काहितरी...

धन्यवाद लाजो. तुमचं म्हणणं बरोबर आहे. मीही असाच विचार केला होत, पण पुढचं काही सुचलं नव्हतं Happy
बदल केला आहे.