शत'शब्द शोधिताना...!

Submitted by अत्रुप्त आत्मा on 7 August, 2013 - 06:33

शतशब्द कथा
हा प्रकार सध्या वेगात प्रचलीत होत आहे.मी ही प्रयत्न करायला गेलो.पण छ्छे! मग माझं मन म्हणालं मला--आत्मू..तुझा प्रांत नाही रे हा.आपला वकूब ओळख मेल्या! पण तरिही ते ऐकेल तर माझं मन कसलं? सलग दोन रात्री मेंदूबरोबर हुतुतू खेळून सुद्धा,हाती काही लागलं नाही.मग मन म्हणालं,तू सावरकरनिष्ठ ना? मग त्यांचे काव्य वाच,स्फूर्ती येइल.अरे अगीचे भस्म आणी राखेचाही अंगार करणारा माणूस तो! त्याच्या शब्द स्पर्शाने तुझा मेंदू चेतणार नाही काय? आणी खरच मेंदू चेतला,पण कुठे? तर काव्याच्याच प्रांतात."कथा" या प्रांतातली "गती" दाखवून,एक खराखुरा "मोक्ष" दिला त्या स्पर्शानी मला!
========================================================

शत'शब्द शोधिताना
शत रात्री व्यर्थ गेल्या
कथिता तुला व्यथा ही
त्या रात्री धन्य झाल्या!

खर्ची पडे वह्यांची
एक थप्पी एका पाठी
कशी साधना तुझी ही
हातात अंती "वाटी"

हाय हाय..जमे न काही
ठेव पाने तू मिटोनी
प्रतिभा नभातं गेली
घरट्यातूनी उडोनी!

Group content visibility: 
Public - accessible to all site users