बांद्रा स्टेशन बाहेर.....

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 4 August, 2013 - 09:43

माणसांची गर्दी
भोंगातील आवाज
श्रद्धेने रस्त्यावर
चाललेले नमाज
रंग बिरंगी डिश
ठेवलेल्या सजून
गरम मसाल्यांचे
गंधीत वातावरण
कडक बंदोबस्त
सावध खाकीधारी
इवल्या शेरवानीत
मुले गोरी गोरी
हिरव्या पताका
सुरमी नजरा
कर्मठ गंभीर
अल्ला हू चा नारा
नवे कोरे बुरखे
उत्साहाने भरले
बाजारी गढलेले
हात मेहंदी सजले
आलो मज वाटे
दुसऱ्या जगात
बसलो अवघे
कौतुकाने पाहत

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमची व्यक्त व्हयची स्टाईलच फार आवड्ते मला
निरागस !!!!!!!!

ह्या विषयाची भावविश्वाची कविता , मराठी माणसाकडून कमी आलेली दिसते ...त्यासाठी अभिनंदन ...मीही हा माहौल खूप जवळून अनुभवला असल्याने ...जगला असल्याने कविता वाचताना सहजच एकरूप होता आले ......

यमकविरहीत व मात्रावृत्तात लिहिली आहे बहुधा कविता . चांगली जमली आहे

अजून बरीच छान करता आली असती पण आहे ही छानच आहे आवडली

हिरव्या पताका<<<<< कधीच विसरू शकत नाही मी हा शब्द ! पताका हा शब्द आजवर भगवा रंगच् मनाला आणत असे.... दिंड्या पताका हा आरतीतला शब्द आठवायचा अनेकदा ..आता हिरव्या पताका वाचून प्रेमात पडलोय अगदी !!!

ह्या शब्दासाठी विशेष आभार

सुंदर......
'बेहरामपाडा' डोळ्यासमोर आला.

पूर्वी एक कविता लिहिली होती मी - '..पाडा'. तीही आठवली.

व्वा ! रमझानच्या महिन्यातला बांद्रा स्थानका बाहेरचा माहौल कवितेच्या कॅमेर्‍यात मस्त पकडलात विक्रांत.. तुम्हाला या विषयवैविध्यासाठी दाद दिली पाहिजे.
यातलं वातावरण अस्सल मुसलमानी असलं तरी त्याला छेद देत (विशेषतः बांद्रा पश्चिमेकडल्या मशिदीजवळचे हे दृष्य असल्यास ) उर्वरित वांद्र्यातील अत्यंत पश्चिमाळलेल्या स्त्रीपुरुषांची ये-जा तिथूनच चालू असते हे वांद्र्याचे वैशिष्ट्य ! अगदी टोकाची चरित्रे बघायला मिळतात वांद्र्यात.

छान.

सर्वांचे मन:पूर्वक आभार .साती correction केले आहे ,धन्यवाद . वैभव,भारतीताई सातत्याने दिलेल्या प्रो त्साहनाबद्दल पुन्हा धन्यवाद