कविता

Submitted by -शाम on 31 July, 2013 - 09:06

त्याच्या मनात येते तेंव्हा
तोही लिहतो मातीमध्ये
नांगरलेल्या रेघेवरती
बैलासंगे त्याची कविता

माळावरती गाळावरती
भाळावरती काळावरती
अक्षर अक्षर पेरत जातो
कातडीतली शाई सांडत

वृत्ते यमके छंद मुक्तके
या सार्‍यांच्या पल्याड उगते
संगणकाच्या खिडकीमधुनी
ना दिसणारी हिरवी कविता

भरल्यापोटी ओठी यावे
इतके नसते सोपे गाणे
कोणासाठी शब्द सोयरे
कोणासाठी कविता भाकर

------------------------------शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कित्ती दिवसांनी लिहितो आहेस रे ??

पण आलास ते अगदी पावसासारखा भरभरून नि भिजवूनही टाकलंस पार ...

सुरेख, अप्रतिम वगैरे विशेषणांच्या पार पलिकडलेच लिहिले आहेस रे ....

स्वातीनी आवर्जून सांगितल्यामुळे लगेच कविता वाचली. फारच सुरेख आहे.

आवडली...संगणकाच्या, किबोर्डाच्या, आंतरजालाच्या..

सगळ्याच्या पल्याड असलेली न दिसणारी हिरवी कविता..भावली..!

शाम, किती सुंदर... किती सहज लिहून गेलात इतकं आतलं.. इतकं तेजस्वी

भरल्यापोटी ओठी यावे
इतके नसते सोपे गाणे
कोणासाठी शब्द सोयरे
कोणासाठी कविता भाकर

आहा... केवळ अप्रतिम.

http://mimarathi.net/smile/congrats.gifhttp://mimarathi.net/smile/congrats.gifhttp://mimarathi.net/smile/congrats.gif

भरल्यापोटी ओठी यावे
इतके नसते सोपे गाणे
कोणासाठी शब्द सोयरे
कोणासाठी कविता भाकर

सर्वांगसुंदर पण त्यातलं हे अप्रतीम................. Happy

खूप खूप धन्यवाद दोस्तांनो..

शशांक, स्वाती, कविता शेअर केल्याबद्दल आपला आभारी आहे.

पाटील, बेफि, उकाका, तुमचा प्रतिसाद नेहमीच उत्साह वाढवतो आणि जबाबदारीही.

माझ्या गेल्याकाही कवितांना आवर्जून वाचणारे आणि योग्य तेंव्हा प्रतिसाद देणारे, अंजली, नंदिनी,शुम्पी,अज्ञात, अमेलिया, शांकली,गजानन,पुलस्ती,अतृप्त,राजीव,अनु,फारएण्ड...

तसेच नेहमी प्रेम देणारे... बागु,रिया,श्यामली,सुप्रिया,नचिकेत,वैभव,डॉ.कैलास,समीर,मुक्तेश्वर,देवकाका आणि दि ग्रेट दाद!

आपल्या सगळ्याच्या ऋणात..

_______________________शाम

Pages