पाऊस

Submitted by पिल्या on 31 July, 2013 - 04:31

पाऊस

सकाळीचं आज पाऊस भेटला
आज मस्त बॅटिंग करतो म्हणला

दुपारपर्यंत धुंवाधार खेळला
संध्याकाळी मात्र सुर्य त्याची दांडी घेउन गेला

वार्‍यालाही सिक्सर हाणीन म्हणला
अन पानांनाही अलगद झेल देउन गेला

फिल्डवर गरमीलाही पळवतो म्हणला
आणि कंटाळल्यावर थोड्या गाराही देतो म्हणला

गवतालाही उभं राहुन चीअर करु देत म्हणला
मातीलाही ओलं होऊ देत म्हणला

सकाळीचं आज पाऊस भेटला..
पुन्हा येताना आधी वीज धाडुन मगचं येईन म्हणला

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! छान कविताय्.:स्मित: असा मस्तीखोर पाऊस डोंगर दर्‍यात धुडगुस घालतो.

पण आता कटाळा आला राव.:अरेरे: सुर्व्यादेव दिसुं नाय र्‍हायला.:फिदी: