अज्ञान पावसाचे?

Submitted by प्राजु on 29 July, 2013 - 08:12

गाऊ नको जराही, गुणगान पावसाचे
बाहेर बघ जरा तू, थैमान पावसाचे

वाहून गाव गेले..! तरिही नभात अजुनी
आहे बरेच शिल्लक.. सामान पावसाचे!

गळली पिके उभ्याने, शेतात नांदणारी
तरिही कसे गळेना अवसान पावसाचे?

कोठे किती झरावे, ठाऊक त्यास नाही
होईल दूर केव्हा, अज्ञान पावसाचे?

ओला नि कोरडाही, दुष्काळ हा नशीबी
चुकतेच नेहमी का अनुमान पावसाचे?

भिजलीस ना जराही, त्याच्यासवे म्हणूनी
झालेय केवढे बघ, नुकसान पावसाचे!

बाहेर तू अवेळी , जाऊ नकोस 'प्राजू'
भलतेच बघ इरादे, बेभान पावसाचे!

-प्राजु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भिजलीस ना जराही, त्याच्यासवे म्हणूनी
झालेय केवढे बघ, नुकसान पावसाचे!<<< व्वा व्वा, झालेच असणार म्हणा! Wink

बाहेर तू अवेळी , जाऊ नकोस 'प्राजू'
भलतेच बघ इरादे, बेभान पावसाचे!<<< मस्त मक्ता!

गझलही आवडली.

गझल फेस्बुक्वर वाचलीचय मी व प्रतिसादही दिले आहेत

खूप आवडली आहे ही गझल सगळेच्या सगळेच शेर !. आजवरच्या तुझ्या मला आवडलेल्या अनेक गझलांमधील ही आणखी एक संस्मरणीय गझल .माझ्या मते ही गझल तू बांधलीस फार छान रदीफ काफिया वृत्त मस्त भट्टी जमली

माझ्यासाठी "सामान पावसाचे " हाच हासिले गझल ...अविस्मरणीय आहे दुसरी ओळ माझ्यासाठी

वाहून गाव गेले..! तरिही नभात अजुनी
आहे बरेच शिल्लक.. सामान पावसाचे!>> मस्त!

भिजलीस ना जराही, त्याच्यासवे म्हणूनी
झालेय केवढे बघ, नुकसान पावसाचे!>>>>>>

क्या बात है!! सुर्रेख!

फार आवडली Happy

कोठे किती झरावे, ठाऊक त्यास नाही
होईल दूर केव्हा, अज्ञान पावसाचे?

भिजलीस ना जराही, त्याच्यासवे म्हणूनी
झालेय केवढे बघ, नुकसान पावसाचे! >>> हे दोन सर्वात विशेष वाटले.

पुलस्तिंशी सहमत.

सर्वच शेर आवडले, आता जरा आधिक सफाई आणि गोटीबंदतेवर विचार झाला की झालेच!

भिजलीस ना जराही, त्याच्यासवे म्हणूनी
झालेय केवढे बघ, नुकसान पावसाचे!

बाहेर तू अवेळी , जाऊ नकोस 'प्राजू'
भलतेच बघ इरादे, बेभान पावसाचे!<<< सगळेच आवडले शेर ..पण हे विशेष. उत्तम गझल.:)

एकदम भारी गझल......मनापासून आवडेश !!
प्रत्येक शेर इतका सहज आलाय ना..... !!
अख्खी गझल जबरी !!

सुरेख !

>> भिजलीस ना जराही, त्याच्यासवे म्हणूनी
झालेय केवढे बघ, नुकसान पावसाचे!

बाहेर तू अवेळी , जाऊ नकोस 'प्राजू'
भलतेच बघ इरादे, बेभान पावसाचे! >> हे जास्त आवडले.

सुंदर गझल.
प्राजु यांच्या रचना आवर्जून वाचाव्याशा वाटतात. ताजंतवानं झाल्यासारखं वाटतं.

फारच छान!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!१