ही पिढी नवी आहे

Submitted by विजय दिनकर पाटील on 24 July, 2013 - 02:33

ही गझल ऐकायची असल्यास प्रत्यक्ष भेटा अथवा येत्या काही महीन्यात प्रकाशित होत असलेल्या पुस्तकाची वाट पहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

पावशील तू भरून झाड गच्च झाले की
ज्यामुळे सुखावलीस.... फक्त पालवी आहे

ओहो, क्या बात है. झकास उतरल्यात ओळी. अगं तु सुखावली आहेस त्या केवळ पालवीमुळे, झाड गच्च बहरेल तेव्हा ते सुख काय असेल. व्वा....!

पुलेशु.

-दिलीप बिरुटे

काय घाट घातलास ते कसे कळू यावे
आज बोलणे तुझे बरेच आर्जवी आहे<<< मस्त

पावशील तू भरून झाड गच्च झाले की
ज्यामुळे सुखावलीस.... फक्त पालवी आहे<<< व्वा

दूर दूर जायचेच उंच उंच जाताना
आजकालच्या जगात हीच थोरवी आहे<<< चांगला शेर

<<<व्हायचे कसे हिचे सवाल वाजवी आहे>>>>

व्हायचे कसे हिचे? सवाल वाजवी आहे

अस हवय का ?

वाचताना अडखळायला होतय , एकवचन-अनेकवचनाच्या घोळात (वै म गै न )

काय घाट घातलास ते कसे कळू यावे
आज बोलणे तुझे बरेच आर्जवी आहे....भन्नाट !

ओघाने माझा आठवला....:-)

चुकले असावे रे तुझे कोठेतरी, काहीतरी
होणार नाही अन्यथा भाषा अचानक आर्जवी

पावशील तू भरून झाड गच्च झाले की
ज्यामुळे सुखावलीस.... फक्त पालवी आहे.....लाजवाब !

शेवटचाही मस्त!

आवडली गझल.

कोरड्या तळयातही अशी फुलून येते ती
राहते तळे जणू अखंड वैभवी आहे

भरतीचा शेर आहे हा पाटील. जमत नसेल तर चार शेरांची गझल टाकीत जा की.

भरतीचा शेर आहे हा पाटील <<<<
<<<<< ओ बाजी राव गेंगाणेबाजी थांबवा !!!

या शेराला नाव ठेवाय्चं काम नाय सांगून ठेवतो !!!!! ह्यात आपली "वैभवा"ची "वैभवी" आलीये !!!!!..आपली जान कुर्बानय ह्या शेरावर .........

आणि काय हो बाजीराव .....वाढदिवस असल्यासारखे वर्षातून एकदा येता आणि मुशायर्‍याच्या मेणबत्त्या विझवता होय????