नेहमी पडणारी स्वप्ने

Submitted by विजय देशमुख on 22 July, 2013 - 23:04

माणसाला नेहमी पडणारी स्वप्ने मुखत्वे खालीलपैकी एक वा अधिक असू शकतात. मानववंशशास्त्राच्या एका व्याख्यानात ऐकलं होतं.

१. धावणे :- यात व्यक्तीला तो स्वतः कोणातरीपासुन बचाव करण्यासाठी धावतोय असं दिसते.
२. पडणे :- बरेचदा हे पडणे बराच वेळ चालू असते, पण जमिन लागत नाही... म्हणजे तो पडतच राहतो...
३. साप :- नुसतेच साप दिसणे किंवा साप खेळताना, मागे धावताना दिसणे. हे भितीदायक स्वरुपातच असते.
४. मारामारी :- कुणालातरी सडकुन मारणे. एक हिरो १०-१५ + गुंड
५. पाण्यात बुडणे :- इथे माधुरीचा १०० डेज आठवला का ?
६. पैसा/ सोने/ खजिना इत्यादी सापडणे.
७. अंधार
८.
९.
१०.

आठवली की लिहितो Happy

यातील बरिचशी स्वप्ने माणसाच्या उत्कांतीशी संबंधीत आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर माणुस आदीमानव व तत्सम काळात होता, तेव्हा तो प्राण्यांची शिकार करण्यासाठी आणि प्रसम्गी बचावासाठी धावायचा. प्राण्यांपासुन बचाव करण्यासाठी झाडावर चढणे आलेच, पण तिथुन घसरुन पडू नये, ही भिती. रात्री अंधाराची भिती, तर सरपटणार्‍या प्राण्यांचीही (उदा. साप). दोन टोळ्यांमधील मारामारी ही कदाचित नेहमीची बाब असावी. (धातू युग). तसेच पाण्यापासुन बचाव करणे आणि पाण्यातील प्राण्यांपासुन (मगर वगैरे) हे मासेमारीसाठी आवश्यक असावे.
पुढे मौल्यवान धातूंबद्दलचं आकर्षण, त्यासाठी सोने/ चांदीचा शोध ओघाने आले असावे.

एकुणच हे वारंवार पडणारि स्वप्ने आपल्या मनात वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या घर करुन बसली आहेत, असं मानववंशशास्त्रज्ञ म्हणतात.

तुम्हाला कोणती स्वप्न वारंवार दिसतात ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सापाची स्वप्ने पडणारी मी एकटीच नाही तर Happy

कधी टिव्ही वर दिसले(मी बघत नाहीच) कि येतात स्वप्नात. मला सापाबद्दल भितीयुक्त आकर्षण मुळीच नाही पण खूप भिती अन किळस (योग्य शब्द सापड्त नाही... पालीला पाहिल्यावर जसे वाटते तसे) वाटते. कमी वेळा स्वप्न पडतात पण जी पडतात ती जास्तकरुन सापाची. या श्रावणाच्या सुरुवातीलाच एक स्वप्न पडले....मी मंदिरात पिंडीसमोर नमस्कार करते आणि पिंडीखालून नाग बाहेर येतो आणि माझ्या पायाला डसतो. जाम घाबरले होते मी. आईला नाही सांगितले.. नाहीतर तिने सगळे सोमवार उपास-तापास करायला लावले असते.

मला बरेचदा स्वप्न पडते पाण्याचे . म्हणजे उंच उंच कातळ आहेत त्यावरून पाणी पडतंय . माझ्या तिन्ही बाजूनी अशीच सिनरी आहे आणि मी खूप खुश आहे खूप खूप आंनदी अशी. मला आणखी पुढे जायचंय . कुठून जायचंय ते शोधत असते पण पाय ही दुखत असतात आणि नवरा ,मुलगा मागेच थांबलेले असतात ते आवाज देतात आणि मला जाग येते. त्या कातळाना स्वप्नात मी अनेकदा बघितलंय पण त्या पुढे जाता आलं नाहीये

मला अनेकदा स्वप्नात रायगड दिसतो . मी चढत असतो. कधी शेवटपर्यन्त जातो तर कधी अर्ध्यावरुनच महाराजाना नमस्कार करुन परत फिरतो . कधी कधी मुंबई गोवा हयवे वरुनच इकडे रायगड आहे तिकडे जायला हवे असे वाटत राहते स्वप्नात .

कदाचित आमच्या पूर्वजांचा काहीतरी सम्बन्ध छत्रपती शिवाजी महाराजांशी होता असे ऐकलेले आहे त्याचा परिणाम असावा अथवा पारलौकिक धागा असावा सूक्ष्म ,... देव जाणे !

अनामिका जी आपले पूर्वजन्मातील अनुभव स्वप्नात दिसणे रोचक वाटले .आपण काही अध्यात्मिक साधना करता का?

स्वप्नात उडत जाऊन खालचे द्रूश्य सेपिया कलर मध्ये दिसणे हा सूक्ष्मदेहाने संचार अथवा प्रक्षेपण या अध्यात्मिक साधनेशी सम्बन्धित अनुभव असू शकतो ... गुगल वर astral projection /lucid dreaming असे शोधून पहा

धन्यवाद किल्ली. मलाही खूपदा तुमच्या सारखी स्वप्नं पडतात, पण एकदा जाग आली की कितीही झोपा परत, अगदी गाढ झोप लागली तरी कधीच माझं स्वप्न परत पुढे कंटिन्यू होत नाही. सुचक स्वप्नं खूपदा पडतात. कधी सिंबाॅलिक तर कधी एकदम डायरेक्ट. डायरेक्ट सांगताना व्यक्ती दिसत नाही फक्त आवाज ऐकू येतो. अनेकदा सांगितलेल्या घटना अगदी जशास तशा घडलेल्या आहेत. अगदी खूप आनंदाच्या तसेच दुःखाच्याही. आनंदाचा प्रसंग आपण साजरा तरी करू शकतो. पण एखादी दुःखद घटना आपण तटस्थपणे फक्त पाहू शकतो, मनात असून सुद्धा काहीही करू शकत नाही. जर आपण काही करू शकत नाही तर ती घटना आपल्याला आधी का दाखवली जाते हे मात्र कळत नाही. माझ्या साठी हा एक संशोधनाचा विषय आहे.

स्वामी विश्वरूपानंद, तुम्ही म्हणता तसं तुमचा रायगडाशी पूर्व जन्मातला संबंध असू शकतो. कारण तुम्हाला अनेकदा ही गोष्ट दिसली आहे. मला माझे खूप पूर्वजन्म अगदी तपशीलवार दिसले आहेत. मी स्वतः ला वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या गॅटअप मधे पाहिले आहे. कधी स्त्री तर कधी चक्क पुरूष.
अनामिका जी आपले पूर्वजन्मातील अनुभव स्वप्नात दिसणे रोचक वाटले .आपण काही अध्यात्मिक साधना करता का?>>>>>>>>>> ह्याचे उत्तर होय असे आहे.

एक विचित्र स्वप्न. साधारण दोन वर्षांपूर्वी पडलेलं. कुठलं तरी देवालय, मी रांगेत ऊभी आहे.( खूप वेळा मी वेगवेगळ्या स्वप्नात रांगेत उभी असते). स्टेज सारखं काहीतरी आहे. मी पायर्‍या चढून वर जाते. वर अतिशय मोठं शिवलिंग आहे. ओपन मंदिर छप्पर वगैरे काही नाही. मी नमस्कार करून बघते तो, शिवलिंगाच्या मागून एक तरुण निघाला अचानक, उंच, अतिशय देखणा. गुढग्यापर्यंत नेसलेले पांढरे धोतर व पांढरे पागोटे होते डोक्यावर, पण पागोटे खूपच मोठे होते. राजा राम मोहन राॅय स्टाईल पण मोठ्ठे. त्याने खूप गोड अशी ओळखीची स्माइल दिली व मला जाग आली (अगदी नको असतांना) मात्र आजपर्यंत अशी इतकी देखणी व्यक्ती मला दिसली नाहिये प्रत्यक्षात कधी. >>>>
अग तो मोहीत रैना असेल, महादेवाच्या वेशात. देवोके देव महादेव मध्ये साध्या गेट अप मध्ये किती क्युट दिसतो. ( बदाम वाली बाहुली )

Sharpie, बाकी मोहित रैना टाईप बाॅडी होती, पण चेहरा वेगळा. चेहरा कुठल्याच एक्टर किंवा माॅडेलशी रिलेट होत नाही. काश.... किल्लींसारखं स्वप्न पुढे सुरू झालं असतं तर बरं झालं असतं.

मला एक स्वप्नं अलिकडे पडतंय. एक स्वर्ग कि नरकासारखे काही तरी आहे. तिथे मायबोलीवर अमानवीय आणि मला पडणारी स्वप्ने या धाग्यावर लिहीणा-या आयड्यांना रांगेत उभे केलेले आहे. चित्रगुप्त उर्फ अ‍ॅडमिन आपले जाडजूड बाड काढून सर्वांचा आयपी अ‍ॅड्रेस पाहून कुणी फेका मारल्यात , कुणी भाबडेपणे लिहीले आणि कुणी खरे लिहीले आहे याचा हिशेब मांडत आहेत. ज्यांच्या पापांचा घडा भरला आहे त्यांना वेमा स्वतः चाबकाचे फटके मारीत आहेत. ज्यांचा पाप पुण्याचा हिशेब होऊन शिक्षा भोगली आहे त्यांना मुक्ती मिळून ते मायबोलीवर पुनर्जन्म घेत आहेत.

काही काही आयडी मात्र चित्रगुप्तालाही हिशेब न करता आल्याने अधांतरीच मायबोलीवर लटकून आहेत.....

आणि मग अचानक जाग आली कि हे स्वप्नं होतं हे कळतं. तोपर्यंत मी घामाघूम ....!

भुताच्या स्वप्नामध्ये, मी नेहमीच भुताला रामरक्षा म्हणून लढाईत हरवल आहे Proud

काल रात्री दिवे गेले होते, प्रचन्ड उकाडा होता.. मला स्वप्नात सारख एका भट्टीत मी बसलेय आणि मल भाजुन काढत आहेत, अस जाणवत होत. मग घाबरुन दचकुन उठले, तर पन्खा बन्द आणि मी घामाघुम!!

साप मला ही स्वप्नात दिसायचे. माझी आई सान्गते की शत्रु किन्वा ज्याला आप्ले चान्गले झालेले पाहावत नाही अशी माणस वाढली की साप दिसतात.
द्रुष्ट काढायची ,

शत्रु>> हो हे असत म्हणे अस
मग मला खुप आहेत शत्रु, सारखेच साप दिसतात

पण माझ कधीच कोणासोबत भांडण होत नाही (नवरा वगळता :फिदी:)

या नियमानुसार रोपं, झाडं, कोंबड्या, बकऱ्या, साप, डास, मुंग्या, झुरळं, आणि सगळेच कीटक प्राणी यांना स्वप्नात मानव ( म्हणजे फक्त मी नव्हे हं) दिसत असतील.

साप म्हणजे 'लै उडू नका, तुम्ही अगदी कोणाच्या अध्यात मध्यात नाही असं तुम्हाला वाटत असलं तरी तुमचे शत्रू पाठीमागे बनायला चालू झालेत, जरा डोळे उघडून वावरा' असा आहे (म्हणजे मनाच्या मागे असलेल्या या फिलिंग साप किंवा विंचू स्वरूपात येऊन वॉर्न करतात.)

शत्रु >>> आमच्याकडे जर अशी स्वप्ने पडु लागली तर ग्रामदेवतेला आणि शेतातील रक्षणकर्ता देव यांना नारळ वाहिला जातो.कोल्हापुरात एक मंदिरही आहे. इथे जाऊन पुजाअर्चा केल्यास स्वप्ने पडायची कमी होतात अशी श्रद्धा आहे.

मला एक वेगळे स्वप्न पडले होते एकदा. मी एका ओळखीच्या एरिया मध्ये गेली आहे. घरी परत येताना अंधार पडलाय. स्वप्नामधील भेटलेल्या लोकांनी मला सांगितले की या रस्त्याने जाऊ नकोस तिथे भूत आहे. मी त्यांचे ऐकले नाही आणि गेले त्या रस्त्याने सायकल चालवत. आणि मधेच अंधारात कोणीतरी मागून माझी सायकल पकडली. मी शंकर महाराज (धनकवडी पुणे मठ) यांना मानते. त्यामुळे स्वप्नात मी त्यांचे स्मरण केले. आणि अचानक माझ्या सायकल ला बसलेली ओढ कमी झाली. मला स्वप्ने शक्यतो आठवत नाहीत. पण हे मला 4-5 वर्षे झाली तरी आठवते आहे.

मला सध्य ऐअतकी स्वप्न पडतायेत की काहे एविचारु नका आणि प्रचंड निरर्थक. माझी बहिण म्हणे पुस्तक लिही तू, विनोदी भयकथा म्हणुन खपुन जाईल

अजून एक स्वप्न, मी माझी नोकरी सोडून 4 वर्षे होतील आता. पण अजूनही मला असे स्वप्न पडते कि मी ऑफिस ला गेलीय ... अर्थातच धावत पळत आणि मला काही काम दिले आहे करायला. पण मला काही आठवतच नाहीये कि ते काम कसे करायचे . गेले 4 वर्ष हे स्वप्न मला बऱ्याचदा पडते.

तसेच बीकॉम 2001 साली झाले पण अजूनही मला अकाउंट्स चा पेपर आहे आणि काही आठवत नाहीये असे स्वप्न पडते.

मला सध्य ऐअतकी स्वप्न पडतायेत की काहे एविचारु>>>
जरा वेळ 'ऐअतकी' म्हणजे काय (हा कसला माबो शॉफॉ?) विचार करत होतो; पुढे 'एविचारु' पाहून कळलं की असं काही नाहीय.

हा धागा इंटरेस्टिंग आहे. मला पूर्वी खूपदा नगरचा भुईकोट किल्ला स्वप्नात दिसायचा. पुढे काही दिवस जागेपणीही ते स्वप्न आठवत रहायचे. एकदा मी नगरला गेलो असताना मुद्दाम त्या किल्ल्याकडे जाऊन आलो. योगायोगाने असेल, अलीकडे ते स्वप्न पडलेले नाही !

मला हल्ली दोन स्वप्न सारखी पडतायेत. अर्थ माहित नाही पण थोडी भिती वाटते

१ - माझा एक मित्र त्याच्या बाईकवरुन कुठेतरी जात असतो अन त्याचा अपघात होतो ज्यात तो मरतो, हे स्वप्न मला आधीही पडले होते बरेचदा तेही अगदी पहाटे Angry पण अशी दु:स्वप्ने ज्याच्याबाबतीत पडतात त्याला सांगीतले तर म्हणे अनिष्ट टळते , पण हल्ली मला त्याला ते सांगणे जमत नाही अन तसेही वाईट स्वप्ने पडली की दरवेळी सबंधीत व्यक्तीला सांगणे जमत सुद्धा नाही मग काय करायचे हा प्रश्न पडतो. एक मन सांगते स्वप्नच ती , ऊठल्यावर धड आठवत सुद्धा नाही मग का टेंशन घ्यायचे अन असे काही नसते, तरी मनाला हुरहुर तर लागतेच Uhoh

२ - मी एका दरीच्या टोकावर ऊभी आहे अन खालुन दरीतुन मला कुणीतरी आवाज देतेय, बोलावतेय.

कोणाला स्वप्ने कळत असतील तर प्लिज सांगा यांचा अर्थ

पण अशी दु:स्वप्ने ज्याच्याबाबतीत पडतात त्याला सांगीतले तर म्हणे अनिष्ट टळते , >>>>>> असं काही नाही.शक्य असल्यास सांगू नका.कदाचित त्या व्यक्तीच्या मनात भिती राहिल आणि आजचा दिवस सुखाऐवजी धास्तीचा असू शकेल.
एक मन सांगते स्वप्नच ती , ऊठल्यावर धड आठवत सुद्धा नाही मग का टेंशन घ्यायचे >>>> हेच खरंय.

फार छान आहे धागा. वाचल्यावर दिलासा मिळाला की आपण एकटेच नाही असे सततच्या स्वप्नांचे साक्षीदार. कधी असंबद्ध तर कधी झोपमोड झाल्यावर देखील किल्ली म्हणते तशी सातत्य राखून स्वप्नं पडतात.

देवकीताई ☺️, थँक्स

वर लिहिलेली स्वप्ने सोडा, हल्ली कुठलेच स्वप्न पडत नाहीये, शांत झोप होतेय. झोपमोड करणाऱ्या स्वप्नंनाकडे दुर्लक्ष करणे बेस्ट, हेच खरे आहे

Pages