मरणासन्न

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 21 July, 2013 - 06:51

रक्त काळे | उलटी मधले |
पुन्हा पडले | रस्त्यावर ||
थोडे दुखले | आत खुपले ||
यकृत सडले |मदिराग्रस्त |
भकास हसणे | मरू घातले ||
गोळा झाले | थुंकीमध्ये |
तसेच शून्य | डोळे होवून| |
गेले हरवून | अंधारात ||
मरण कृपाळू | होत उदार |
येवुन समोर | उभे ठाके ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !
डोळ्यांसमोर उभा राहिला हा अल्पाक्षरी मरणासन्न अनुभव !

आज कुणी 'टाकून' आलं असेल मायबोलीत, तर त्यांनी लक्षात ठेवावा हा अनुभव . . . .
Lol !