एको

Submitted by हरवलेल्या जहाजा... on 20 July, 2013 - 05:57

स्ट्रेंजर बनुन फिरताना
माझ्या बालपणातुन
विखुरलेली दिसतात मला
टुरिस्ट गाईड्स रस्त्यांतुन

एकट्या विराट शहराच्या
कोसळत्या खिडक्यांतुन
फुलपाखरांचे नाजूक थवे
जातायत रेडलाईटमधुन.

सी, दे हॅव डिपोर्टेड अ‍ॅलिस
प्लिज डू टेक मी टु हर
जिथपर्यंत तिचे किसेस
तरळतायत जिभेवर

तिची शिल्पं बरळतायत
मौनाच्या परिघाला समांतर
की मॅड हॅटरच आहे
omniscient परमेश्वर

सगळ्या वाटा जातात
भगव्याशा खिंडीतुन
विराट घोळका घुमतोय
जॅझच्या गजरातुन

हे लव
कम हिअर अँड जॉईन मी
विथ युअर कोरस ऑफ स्मोक
सत्याच्या गाभ्यावरुन मुळासकट
चुरगाळून टाकू जग

आणि
त्यांच्या शाश्वत दु:खासह
वारकरयांच्या दिंड्या
कोसळतील वंडरलँडमध्ये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन ठिकाणी, नव्या लोकांत, कसलेही संदर्भ माहीत नसताना, एकट्याने वावरताना जसं सगळंच अनोळखी आणि अगम्य वाटतं असं काहीसं.

अतीशय वेग़ळेपणाने चितारलीत वारी

पण जरा काहीच्या काहीच आहे असे वाट्ले बहुधा मला अजून पचली नसावी ही कविता बघू जरा वेळाने पुन्हा एक प्रयत्न करीन

असो खूप दिवसांनी कविता आली तुमची आनंद झाला