अवनी

Submitted by अज्ञात on 19 July, 2013 - 08:09

भिजल्या उरात जखमा सजले नवीन गाणे
वारा उतून वाहे गुंफीत गूढ कवने
ओटीत सांडले जे अस्पर्श स्पर्श लेणे
फुलल्या सयी पुन्हा त्या झाले सुरेल जगणे

अंकूर सुप्ततेचे बिलगूनसे अडाणे
वेडात धुंदलेले नि:शब्द मन शहाणे
आजन्म भुक्त जैसी आसक्त ओल माती
ओढाळल्या गतांचे शब्दाविना तराणे

पवनासवे वराती मेघात सकल पाणी
सहवास लाघवाचा स्वच्छंद मूक वाणी
सुखनैव वेदनांची गर्भारली विराणी
अवनीच की जणू ही दूजी नसे कहाणी

........................अज्ञात

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय सुंदर तुलना आहे ही. !! आता तुम्ही नवीन नाही आहात. तरी अजूनही तुमच्या रचना लोकांना गूढ आणि दुर्बोध वाटतात ? आश्च्रर्य आहे. छान असते तुमची अभिव्यक्ती. वेगळ्याच जगात वावरत असता तुम्ही. लिहीत रहा.