चिंगरी भापा

Submitted by अनिश्का. on 18 July, 2013 - 02:06

सर्वात पहिले मला एक बोलायचं आहे...की ही रेसिपी मला जेव्हा कळली तेव्हा ती करुन बघण्याच्या उत्साहात फोटो काढायला विसरले.. पण झाल्यावर ही खायच्या उत्साहात फोटो काढायला विसरले....

असो....हल्ली रेसिपी लिहायच्या आधी ती कशी केली या पेक्षा ती कशी सापडली,त्याच्या पाठचा इतिहास काय वगैरे वगैरे सांगण्याची ईश्टाईल आहे...तर मी पण एक छोटुसा प्रयत्न करणार आहे......

माझ्या बंगाली ऑफिस कलिग ने एकदा हा पदार्थ आणला होता...त्यांचा म्हणे तो खास पदार्थ आहे....मी कट्टर मासे खाउ तसच फिगर कॉन्शियस असल्याने त्याने खास माझ्या साठी हे करुन आणलं होतं.....आधी नाव ऐकुन काहिच बोध झाला नाही काय प्रकार आहे नि काय...पण लंच टाईम पर्यन्त कशी बशी टपकत असलेली लाळ आवरुन धरली ( नाहीतर उगच की बोर्ड खराब व्हायचा हो ) लंच टाईम ला मला तो पदार्थ मिळाला एकदाचा.....आणि खर सांगते मला वेड लावलं ना त्या चिंगरी भापा ने.......आता आठवडयातुन एकदा तरी तो मी घरी बनवुन खाते...आणि नवर्याला पण देते....त्यालाही ते आवडु लागलय... Happy

या सर्व गदारोळात मी सांगायला विसरले की चिंगरी म्हणजे कोलंबी आणी भापा म्हणजे वाफवणे आणि मुख्य म्हणजे यात तेल फक्त नावाला असते....नपेक्शा जवळ जवळ नसतेच

तर आता तुम्हाला जास्त न पकवता मी रेसिपी स्टार्ट करते...खुप जणांना ही रेसिपी माहित असण्याची शक्यता आहे ..पण मला नवीनच कळलं असल्या मुळे अति उत्साहात मी इथे ती टाकत आहे.......

चिंगरी भापा

अर्धा किलो टाईगर प्रॉन्स
एक वाटी ओलं खोबरं
अडिच टेबल स्पून राई
४ ते ५ डार्क हिरव्या ( तिखट) मिरच्या
४ पाकळ्या लसुण ( सोलुन )
अर्धा इन्च आले
थोडी कोथिंबीर
अर्धा टेबल स्पून गोडे तेल ( बंगाली लोक यात राई तेल घालतात )
मीठ - चवी नुसार
हळद - चिमुटभर

क्रुती : -
प्रथम प्रॉन्स सोलुन घ्यावे आणि २ - ३ दा पाण्यातुन धुवुन काढावेत....आणि कोरडे करावेत
( त्याचे मधले दोरे बिरे काढुन टाकावेत नाहीतर पोटु खराब होईल )
आता लसुण आणि आल्याची खलबत्त्यात कुटुन पेस्ट करा आणि त्या अर्धा चमचा तेलात सॉटे करुन घ्या.
ही पेस्ट , हळद , मीठ प्रॉन्स ला चोळुन ठेवा
एका बाजुला खोबरं,राई ,४ मिरच्यांपैकी २ मिरच्या , कोथिंबीर ची पेस्ट करुन घ्यावी मिक्सर मधे ..पाट्यावर वाटले तर बेश्ट..पण इतका वेळ आहे कुणाला?????
खोबर्या ची पेस्ट बनवताना पाणी घालायचं नाही ..अगदी लागलच तर १ छोटा चमचा घाला....थोडं सुकं पण फाईन पेस्ट झाली पाहिजे
ही पेस्ट पण प्रॉन्स ला चोळुन टाकावी आणि उरलेल्या दोन मिरच्या उभ्या कापुन त्या मधे टाकुन द्या.
आता त्याला १५ मिन मॅरिनेट होईपर्यंत बाजुला ठेवा..... (त्या १५ मिनीटात बाकीची कामे करु शकता )
आता त्याला एका चपट्या डब्ब्यात भरा ....झाकण लावा...आणि कुकर मधे टाकुन ३ ते ४ शिट्या काढा.....
कुकर थंड झाला की कसलीही वाट न बघता भात असेल तर भात , चपाती असेल तर चपाती , भाकरी असेल तर भाकरी बरोबर खाउन टाका गरम गरम........
( वरील प्रमाणे मॅरिनेटेड प्रॉन्स केळीच्या पानात रॅप करुन स्टीम केले तरी अप्रतीम् लागतात असं त्या कलिग ने सांगितलय )

( आंतर्जाला वरुन एक फोटो टाकलेला पण अ‍ॅडमीन ने तसं न करण्यास सांगितले कारण कॉपी राईट नव्हता... मग फोटो काढुन टाकला Sad आता दुसर्यांदा बनवेन तेव्हा टाकेन फोटो)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी! नवर्‍याला सांगावे लागेल. तोच बनवुन खाईल्.:फिदी: कारण मी घासफुसवाली. पण फोटु सुद्धा चांगला आहे. बरयं तेला तुपाची जास्त भानगड नाही.:स्मित:

बरयं तेला तुपाची जास्त भानगड नाही>>>> खोबर्या मधे ही कॉलेस्ट्रोल असतंच ना??? पण मला असं वाटतय खोबरं कमी वापरुन ही चांगलं बनु शकेल....ट्राय करायला हवं..... टुनटुन नवरा आनंदाने करेल....सोप्पं आहे खुप ते..... Happy

मी अनिश्का,

इंटरनेटवरून चित्र घेताना प्रताधिकाराचा भंग होत नाही हे पाहायला हवं. जिथून चित्र घेतलं आहे तिथे तपासून पहा.

अनिश्का खोबर्‍यामुळे तशी शंका आली तरी त्यात लसुण आपण वापरतो ना, त्यामुळे समतोल राखला जात असेल. पण एकंदरीत वाफवलेले पदार्थ हेल्दी असतात्.:स्मित:

इंटरनेटवरून चित्र घेताना प्रताधिकाराचा भंग होत नाही हे पाहायला हवं. जिथून चित्र घेतलं आहे तिथे तपासून पहा.>>>>>पण ते कसं पहायचं??? मला माहित नाही आहे......

मी अनिश्का,

तुम्ही वापरलेली इमेज प्रताधिकारमुक्त नाही.
http://recipecaravan.com/recipes/bhapa_chingri_steamed_shrimp_with_musta... हा मूळ फोटो.
परवानगीशिवाय तुम्ही ही इमेज वापरू नये, असं http://recipecaravan.com/caravan-rules/ इथे लिहिलं आहे.

एक वाटी खोबरे म्हणजे लो कॅलरी नाही. तेल वापरले नसले तरी खोबर्‍यात तेल आहेच की. वाफवायची ऑप्शन बरोबर आहे. ३-४ शिट्ट्यांमध्ये तुरीची डाळ पण शिजते. प्रॉन्स ओव्हरकुक होतात का बरोबर शिजतात?

बरयं तेला तुपाची जास्त भानगड नाही>>>> खोबर्या मधे ही कॉलेस्ट्रोल असतंच ना??? पण मला असं वाटतय खोबरं कमी वापरुन ही चांगलं बनु शकेल>>> पण प्रॉन्समधे कॉलेस्ट्रोल असतेच कि!!

बरयं तेला तुपाची जास्त भानगड नाही>>>> खोबर्या मधे ही कॉलेस्ट्रोल असतंच ना??? पण मला असं वाटतय खोबरं कमी वापरुन ही चांगलं बनु शकेल>>> पण प्रॉन्समधे कॉलेस्ट्रोल असतेच कि!!>>> +१

पण मालवणी लोकांत तर भरपुर नारळ खाल्ला जातो.... शिवाय तेल असतेच...आणि प्रॉन्स तर जिव्हाळ्याचा विषय....मग कॉलेस्ट्रॉल च काय होत असेल??? इन्फॅक्ट प्रॉन्स मधे कॉलेस्ट्रॉल आहे हे मला आता च कळ्ळं.. Sad मला भयंकर आवडतात ते......

दोन्ही मिळून कोलेस्टेरॉल की मात्रा डेंजर लेव्हल के पास जा सकती है. >>> रोज खाणार का हे?? एखादा दिवस खायचं आणि मग नंतरचे दिवस हात आवरता घ्यायचा आणि दणकुन व्यायाम करायचा. कॉलेस्ट्रॉलच्या भितीने मन नाही मारायचं