स्पर्श

Submitted by सई गs सई on 17 July, 2013 - 03:57

आसावलेली रात
डोळा नाही नीज
स्पर्श स्वप्नातले
मागताती वीज

काळोख काठावर
हले वार्‍याने रान
शिरे गाभार्‍यात
तुझे चांदण-ऊन

कधी याच गावी
स्पर्श भारावलेले
माझ्या प्राक्तनाचे
आभाळ सांडलेले

आता जाग नाही
सुन्न सार्‍या ग्रंथी
बर्फाचे घर माझे
हरवले सर्व साथी

बर्फाचे घर माझे
हरवले सर्व साथी..

- सई

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users