कविता

Submitted by देवा on 15 July, 2013 - 00:21

तू नकोच बोलुस काही
मिटलेले राहू दे ओठ
ह्या मनात अंकुरलेला
नाज़ुकसा कवळा देठ

तू येणार म्हणूनी त्याला
आधीच कळवले आहे
त्या अधीर वाटेवरचा
वाराही खोळंबुन आहे

तुझ्या डोळ्यांमधली ओल
आहे अजून अर्थवाही
मोक्षाची ग्वाही मिळते
माझ्या अस्फुट शब्दालाही

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझ्या डोळ्यांमधली ओल
आहे अजून अर्थवाही
मोक्षाची ग्वाही मिळते
माझ्या अस्फुट शब्दालाही

सुरेख देवा!

सुंदर कविता....

त्या अधीर वाटेवरचा
वाराही खोळंबुन आहे >>>> याऐवजी

त्या अधीर वाटेवरचा
वाराही निश्चळ आहे >>>>> कसे वाटेल (वै. मत)

छान!