ग बाई तुन्ह नाव शे सुपडाबाई

Submitted by पाषाणभेद on 13 July, 2013 - 18:11

मंडळी खालील गीत हे अहिराणी भाषेत (खानदेशी नव्हे) लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. ही भाषा मला ऐकून ओळखीची आहे परंतु त्यावर माझे प्रभुत्व नाही. यास्तव काही शब्द कमीजास्त असतील तर ते सांगावेत. (अहिराणी भाषेबद्दल येथे माहीती आहे.)

ग बाई तुन्ह नाव शे सुपडाबाई
तू मन्हाकडे का पाहत नाही?
ग बाई तुन्ह नाव शे सुपडाबाई ||

तुन्हा गळा मा सोनानी माळ
तू पायमा बांधस चाळ
तू लाजत लाजत जाई
ग बाई तुन्ह नाव सुपडाबाई ||

तुन्हा घरावर मी मारस चकरा
तुन्हा बाप व्हई का मना सासरा?
मन्ह प्रितेम का तुले दिसत न्हाई
ग बाई तुन्ह नाव सुपडाबाई ||

तुले पाहीनसन व्हयनू मी येडा
तुन्हासाठी मी बाजार धंदा सोडा
जीव जळस मन्हा थोडा थोडा
एखादडाव मनाकडे जरा लय पाही
तुन्ह नाव शे सुपडाबाई ||

तु सकाळ सकाळ बकर्‍यान्सामांगे जास
मी तठे तुन्हा मांगे मांगे येस
तूले तरीबी मना पत्ता कसा लागत नाही
तुन्ह नाव ग सुपडाबाई ||

तुन्हा भावाले मी मित्र करी लेस
तो पैलवान गडी शे मी घाबरस
आप्ला कार्यमा त्यानी ढनढन परवडणार नाही
तुन्ह नाव ग सुपडाबाई ||

आते पाऊसपानी बरा व्हयेल शे
डांळींबनी बाग मी आता लावेल शे
कांदास्ना पैसाबी मना खिसामा शे
यंदा मोसममधार लगीनले मन्ही काही हरकत नाही
तुन्ह नाव ग सुपडाबाई ||

- पाभे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व रसिक वाचकांचे मन:पुर्वक आभार.

इतरत्र टंकलेला प्रतिसाद बोलीभाषांचे महत्व समजावे या हेतूने येथे पुन्हा उधदृत करीत आहे.

मराठीत अनेक बोलीभाषा आहेत जसे मालवणी, आगरी, वर्‍हाडी, अहिराणी आदी. खानदेश परिसर म्हणजेच जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा व नंदूरबार जिल्हा तसेच या जिल्ह्यांलगत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालूका (सटाणा), मालेगाव तालूका, कळवण तालूका आदी जिल्ह्यांमध्ये ही बोलीभाषा बोलली जाते. या भागांमध्ये गुजरात तसेच मध्यप्रदेशातील काही भागही येतो. ह्या भाषेवर गुजराती भाषेचे काही संस्कार आढळतात. ऐकायला गोड वाटणारी ही बोलीभाषा प्रमाण मराठी बोलणार्‍याला सहज समजू शकते.

वर उल्लेखलेल्या प्रांतांमध्ये या भाषेचे पोटभेद देखील आहेत. नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागात, तसेच नंदूरबार धुळे जिल्ह्यात अहिराणी बोली आढळते. जळगाव जिल्ह्यात खानदेशी बोलीचा प्रभाव आढळतो. या भागांमध्ये आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्य करून आहे. येथील निसर्ग अजूनही संपन्न आहे. नागर संस्कृतीचे अतिक्रमण या भागांमध्ये कमी प्रमाणात आहे. सर्वसाधारण पुर्वपरंपरा, देवआचरण, रितभात या भागातले लोक पाळतांना आढळतात.

ही बोलीभाषा लिहीण्यासाठी मराठी वर्णमाला वापरली जाते.

बोलीभाषांना स्वत:चे असे व्याकरण, शब्दांचे भांडार, उच्चारण शैली असते. असे असतांना प्रमाणभाषेचे बोलीभाषेवर प्रभुत्व जाणवते. बोलीभाषा साधारणत: एखाद्या प्रदेशात बोलली जाते. ती भाषा बोलणारे लोक इतर सरकारी, व्यावहारीक, शैक्षणिक व्यवहार पार पाडतांना प्रमाणभाषेचे सहाय्य घेतात. प्रमाणभाषा कायम बोलणारा व्यक्तीसमूहात मात्र बोलीभाषा बोलणारा व्यक्ती गावंढळ, गावठी, अशिक्षीत आहे असा समज होतो. असे पायंडे पडणे हे बोलीभाषांना मारक आहे.

बोलीभाषांचा योग्य सन्मान हाच भाषाविकासाचा पाया आहे.

वाचताना तो हेल येईलच असेल नाही त्यामुळे समजायला अंमळ वेळ लागतो. माबोवर ऑडिओ देता येइल का? ऐकायला मजा येईल. Happy

@विजय देशमुख
>>> माबोवर ऑडिओ देता येइल का? ऐकायला मजा येईल.
अहिराणी माझी बोलीभाषा नाही त्यामुळे मी त्या भाषेत बोलतांना शब्दांचे त्या बोलीभाषेतील उच्चारण होईलच याची खात्री नाही.

(अन माझ्या आवाजातील गाणे ऐकतांना तुम्हाला चक्कर, मळमळ, उलटी किंवा भोवळ आल्यास इस्पितळात कोण भरती करेल? :-))

पाषणभेद :- (अन माझ्या आवाजातील गाणे ऐकतांना तुम्हाला चक्कर, मळमळ, उलटी किंवा भोवळ आल्यास इस्पितळात कोण भरती करेल? स्मित) >>> असं होणार नाही याची खात्री आहे, कारण मी सवतःची गाणी ऐकतो की Happy

अहिराणी ज्यांची बोलीभाषा आहे, त्यापैकी कोणी आहे का?

माले येस अहिराणी. पण audio कसा upload करतस, ते न्हई समजी र्‍हायन.
If someone can guide, then i may upload the audio. and it's really sweet to hear this language, specifically in their villages.

तु सकाळ सकाळ बकर्‍यान्सामांगे जास
मी तठे तुन्हा मांगे मांगे येस
तूले तरीबी मना पत्ता कसा लागत नाही...
अहिराणी सैराट...
अहिराणी येत नाही पण अर्थ समजला.
म्हणजे यंदा कवितेतील नायक लग्न करणार...
पाषाणभेद (दगडफोड्या) नेहमी प्रमाणे मस्त..
(गाण्याला संगीत देऊन ऑडिओ ट्रैक टाकला तर ऐकायला मजा येईल. )