लेह - लडाखची सहल

Submitted by निर्मल on 11 July, 2013 - 11:44

CAM00159.jpgCAM00180.jpgCAM00196.jpgCAM00215.jpgCAM00226.jpgCAM00237.jpgCAM00238.jpgCAM00241.jpgCAM00250.jpgCAM00254.jpg

२७ जून २०१३
श्रीनगरहून सकाळी ८.३० वा निघालो. लवकर निघायला हवं होतं. त्यामुळे ट्रेफिक जाममध्ये अडकलो. सोनामर्गला पोचेपर्यंत बराच वेळ गेला. नंतर बालतालला पोचेपर्यंत अमरनाथ यात्रेची गर्दी होती. मग मात्र गाडी सुसाट पळू लागली. साधारण २.३० वा आम्ही द्रासला पोचलो. पाऊस पडत होता. वातावरण चांगलेच गार झाले होते. रस्त्याला लागूनच अली धाबा इथे छान गरमागरम शाकाहारी जेवण मिळालं. तिथून निघाल्यावर साधारण तासाभरात कारगील आलं.
हा सगळा प्रवास अत्यंत निसर्ग रम्य वातावरणातून होतो.
कारगीलचं विजय स्मारक अतिशय छान आहे. जिथे प्रत्यक्ष लढाई झाली त्या डोंगर रांगेच्या पुढेच हे स्मारक बांधले आहे. आपल्या जवानांचा खूप अभिमान वाटला. त्यांच्यामुळे आपण किती आरामात राहू शकतो ते कळतं. कारगिलला आम्ही हॉटेल ग्रीनलेंड येथे राहिलो. बरे होते ते खास नसले तरी. जेवण आणि नाशता चांगला होता.

28 जून २०१३
आजही नाशता करून सकाळी ८.३० वा निघालो. साधारण १.३० ते २.०० तासात मुलबेख येथे पोचलो. इथे डोंगरावर कोरलेली मेय्त्रेया (maitreya) बुद्धाची प्रतिमा आहे. जवळच प्रार्थना चक्र पण आहे. त्याचे दर्शन घेऊन पुढे लामायुरु येथे गेलो. त्याआधी श्रीनगर लेह रस्त्यावरील सर्वात उंच जागा फोतुला खिंड लागते. तेथे फोटो काढून झाले. सर्वच ठिकाणी खिंडीजवळचा रस्ता चागलाच खडबडीत असतो. लामायुरू येथे जुने बौध्द मंदीर आहे. (Monastary). सर्वच मंदिरे भव्य आणि प्रेक्षणीय आहेत.
मंदिराजवळच हॉतेल आहे. तेथे जेवण घेतले आणि पुढे कुच केले. लेहच्या वाटेवर एके ठिकाणी खडकांची वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. ती अगदी चंद्रावरील राचानेसारखी आहे. त्यामुळे त्या भागाला चंद्रभूमी म्हणतात.
नंतर वाटेत सिंधू आणि झन्स्कर या नद्यांचा संगम लागतो. इथे राफ्टिंगची पण सोय आहे. संगम बघून आम्ही लेहच्या रस्त्याला लागलो. ४.३० – ५ वा आम्ही लेहमध्ये प्रवेश केला. लेहच्या मुख्य बाजाराधी सुंदर गेट आहे. आमचे होटेल बाजारापासून थोड्याच अंतरावर होते. चुबी असे त्या भागाचे नाव होते. होटेल म्हणजे गेस्ट हौस. होर्पो गेस्ट हाऊस. आम्ही चौघे जण असल्यामुळे २ खोल्या घेतल्या होत्या. छान स्वछ आहे आणि माणसेही मदत करणारी आहेत. भाड्यअमअधेच नाशता आणि रात्रीचे जेवण यांचा समावेश होता. ते चांगलेही असायचे.

लामायुरू येथील बौद्ध मंदिर
CAM00263.jpgCAM00266.jpgCAM00269.jpgCAM00274.jpg

लेहमध्ये प्रवेश केल्यावर थोडया वेळाने त्रास जाणवायला लागला. तो भाग वर प्रतिसादामध्ये दिलाच आहे. या सर्व प्रकारामुळे त्या दिवशी रात्री जेवण घ्यायला फारच उशीर झाला. पण दुसरया दिवसापासून बरे वाटले.

चंद्रभूमीचे फोटो
CAM00280.jpg

२९ जून २०१३
आज सर्वात आधी इनर लाइन परमिटचे काम करायचे होते. त्या साठी नोरबु जवळ अर्ज भरून दिला. बरोबर सर्वांची पॅन कार्ड्स. त्या दिवशी संध्याकाळी ६ तारखेपर्यन्तचे परमिट मिळाले. या साठी फी होती प्रत्येकी २००. आज स्थानिक स्थळ दर्शन करायचे होते. सर्वात आधी लेहचा राजवाडा बघायला गेलो. लेहमधे सर्वच ठिकाणे उंचावर आहेत. त्यामुळे चढउतार करायलाच लागतात. हे सगळे बांधकाम मातीचे आहे. ते कसे केले असेल याचे आश्चर्य वाटत राहते.
यानंतर आम्ही कालीमाता मंदिर पाहायला गेलो. हे खरेतर बुद्धाचे स्त्रीरूप – मंजुश्री आहे. हे ही उंचावरच आहे. दुपारी जेवण झाल्यावर शांती स्तूप बघायला गेलो. इथून लेह शहराचा नयनरम्य देखावा दिसतो.
यानंतरचे ठिकाण होते हॉल ऑफ फेम. हे आर्मीने बांधलेले म्युझियम आहे. इथे लडाख परिसराची ऐतिहासिक, भौगोलिक, पर्यावरण अशी सर्वच माहिती आहे. तसेच या परिसरातल्या आर्मी युनिट्सची पूर्ण माहिती आणि त्यांचे कार्य यांची माहिती विविध वस्तू, प्रतिकृती, प्रकाशचित्रे यांच्या सहाय्याने दिली आहे. इथल्या सर्वच लढायांची आणि लढवय्यांची सविस्तर माहिती दिली आहे, तसेच युद्धातल्या वस्तुही मांडलेल्या आहेत. आवर्जून बघावे असेच हे ठिकाण आहे.
CAM00281.jpg

सिंधू व झंस्कारचा संगम

CAM00310.jpg

लेह महाल

CAM00315.jpgCAM00330.jpg

शांतीस्तूप
CAM00341.jpg

३० जून २०१३
आज लेहपासून जवळची ठिकाणे बघायला जायचे होते. सर्वात आधी हेमिस येथील बुद्ध मंदिर बघायला गेलो. हे इथले सर्वात श्रीमंत बुद्ध मंदिर. खूपच छान आहे. त्यांचे वस्तु संग्रहालयही आहे. येथील भित्तीचित्रेही छान आहेत.
नंतर ठिकसे येथील बुद्ध मंदिर बघायला गेलो. हेही छानच आहे.
श्ये येथील बुद्ध मंदिर मात्र आम्ही सोडून दिले. कारण सगळी सारखीच.
त्या ऐवजी आम्ही नोरबूच्या घरी गेलो. त्यांचे नवीन घर तर चक्क महालच होता. तिथे बिस्कीटांबरोबर नमकीन चहाचा आस्वाद घेतला. नेहमीचा चहाही झालाच होता. पोट भरलेले असल्याने जेवणाचा आग्रह मात्र नाकारला. त्यांचे जुने घरही बघितले. ते अगदी पूर्वीसारखेच ठेवले आहे. त्याचे वस्तुसंग्रहालयात रूपांतर केले आहे. तिथे चित्रपटांचे चित्रीकरणही होते. नोरबूच्या घरची सर्वच माणसे फार आतिथ्यशील होती. त्यांचा निरोप घेउन आम्ही स्तोक राजवाडा पहायला निघालो.
परत उंच पायऱ्या चढून स्तोक राजवाडा बघितला. राजवाड्यातील स्वयंपाकघर मात्र नोरबूच्या घरातील स्वयंपाकघराच्या तुलनेने साधेच वाटले.
ही ठिकाणे बघून दमून लेहमध्ये परतलो. तिथे डोसा मिळणाऱ्या हॉटेलचा शोध लागला. बऱ्याच दिवसांनी साधा डोसा खाल्ला, चांगला होता. आणि मग विश्रांतीसाठी आमच्या हॉटेलवर परतलो. आता उद्या नुब्रा दरीला (व्हॅली) जायचे होते.

१ जुलै २०१३
सकाळी ९ वाजता आम्ही नुब्रा व्हॅलीला जायला निघालो. आज खरदुंग पासवरून जायचे होते. लेहपासून खरदुंग ला (ला म्हणजे खिंड) फक्त ३४ किमी आहे. तिची उंची १८३८० फूट आहे. खिंडीजवळचा रस्ता खूपच खडबडीत आहे. तिच्या दोन्ही बाजूला दक्षिण पुल्लू आणि उत्तर पुल्लू हे तपासणी नाके आहेत. त्यांची उंची १५३०० फूट आहे. निसर्गाचे रमणीय दर्शन या प्रवासात होते. थंडीही तेवढीच वाजते. त्यामुळे बाथरूमचा शोधही अनिवार्य बनतो. खिंडीच्या सर्वात वरच्या ठिकाणी पोचल्यावर अगदी स्वर्गात पोचल्याचा भास होतो. तिथे अगदी २ मिनिटेच थांबून फोटो काढले आणि निघालो. मग डिस्कीट पर्यंत प्रवास करायचा होता. डिस्कीटला आम्ही साधारण १२.३० ला पोचलो. इथे आमचा मुक्काम हॉटेल ओलथांग येथे होता. जेवण झाल्यावर लगेचच हुंडर येथे जायला निघालो. इथे दोन मदारीचे उंट असतात. मुलांनी त्यांच्यावर बसून फेरी मारली. मग थोड्या वेळाने आम्ही हॉटेलवर परतलो. प्रवासात खूपच दमायला झाले होते. त्यामुळे नंतर फक्त विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी असाच भरपूर प्रवास करून लेहला परत आलो.

खरदुंगला मधील काही छायाचित्रे
CAM00406.jpgCAM00414.jpgCAM00421.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो छान आहेत, डिटेल्स पण येऊ द्या.

लेहमध्ये हवामानाचा त्रास कितपत झाला?

औषधांची गरज पडली का? तुम्ही सोबत नेलेली का? ऑक्सिजन सिलेंडर घ्यावा लागला का? सोबत घेणे योग्य आहे असे तुम्हाला तिथे गेल्यावर वाटले का?

तिथे खायला काय मिळते? किंमतीचा अंदाज?

दिवसाचा बराच वेळ गाडीतच जाणार, मग खाणे/पाणी इ. गोष्टी जायच्या वाटेवर मिळतात का?
इथुन आपणासोबत खाण्यासाठी काहीतरी (लाडू, चिवडा इ. टाईमपास गोष्टी) घेऊन जावे काय?

तिथे जेवणात काय काय खायला मिळते?

खादाडीच्या चांगल्या जागा आणि टाळण्याजोग्या जागा कुठल्या?

दिवसा आणि रात्रीच्या तापमानात कितपत फरक आहे?

गरम कपडे सोबत न्यावेत काय?

आम्हीही ऑगस्टमध्ये जातोय, त्यामुळे जेवढी जास्त माहिती मिळेल तेवढे बरेच आहे.

फोटो मस्त ,तिकडच्या लोकांबद्दल लिहा .ते ऑक्टोबर ते मार्च काय करतात काय त्रास असतो वगैरे .

व्रुत्तान्त आधी टाकला आहे. त्याला कोणाचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुढे लिहिले नाही. लेह लडाख शोधले तर मिळू शकेल कदाचित. फोटो लोड करायचा हा पहिलाच प्रयत्न होता. ते एडिट करून मग लोड करावे लागतात. त्यामुळे २ - ३ प्रयत्नानअन्तर कण्टाळून नुसते फोटो लोड केले, नावे न टाकता. तरी सगळे नाहीच केले. हे फक्त २-३ दिवसान्चेच आहेत. ट्रीप एकूण १० दिवसान्ची होती. फोटो मोबाइलवर काढ्लेले आहेत. सर्वान्ना धन्यवाद. वेळ मिळाला की लिहितेच.

इथे सविस्तर वृ. वाचायची सवय आहे, त्यामुळे एकच फोटो आणि थोडीशी माहिती पाहुन लोकांनी 'सगळॅ येऊदे, मग घेऊ समाचार Happy ' असा विचार केला असावा..

फोटो मोबाईलवर असले तरी छान आहे. पिकासावरुन अपलोड करा, झटपट होतील.

आणि माझ्या प्रश्नांची उत्तरेही जमल्यास द्या. Happy

साधना,

हवामानाचा त्रास झालाच. मला स्वतःला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. लेहला पोचल्यावर अस्वस्थ वाटायला लागलं. मळमळ्ण्याचा त्रास होत होता. तरी आम्ही कोका ३० या होमिओपाथी गोळ्या आधीच सुरू केल्या होत्या. पण एकूण प्रकार आणि अपरिचित जागा यामुळे जास्त रात्र व्हायच्या आधी डॉ कडे जावे असा विचार केला. आमच्या ड्रायव्हरने आम्हाला सोनम नोरबू रुग्णालयात नेले. अतिशय उत्तम व्यवस्था. त्यांनी बी पी तपासले, ऑक्सिजन लेवल तपासली. ते अनुक्रमे जास्त व कमी होते. त्यामुळे एक इंजेक्शन दिले. बी पी च्या गोळ्यांचा डोस तिथे असेपर्यंत डबल करायला सांगितला आणि एक तास ऑक्सिजन दिला. तसंच ३ दिवस डायमॉक्स गोळ्या (दिवसाला २) घ्यायला सांगितल्या. आणि फी फक्त २ रू. ओषधे आपल्याला विकत आणावी लागतात.

ऑक्सिजन सिलिंडर आम्ही नंतर विकत घेतले. (३०० रु एक). पण लागले नाही. येताना ड्रायव्हरला भेट देऊन आलो.

खायला सगळं काही मिळ्तं. अर्थात इड्ली डोसावालं एकच हॉटेल दिसलं. चायनीज मिळ्तं. पंजाबी मिळतं.

आमचं हॉर्पो गेस्ट हाउस होतं. रुमच्या भाड्यात नाश्ता आणि रात्रीचं जेवण होतं. ते आम्ही तिथेच घेत होतो. सकाळचं जेवण मात्र बाहेर होत होतं. त्याचे साधारण ६०० ते ७०० होत होते.

बराच खाऊ बरोबर घेतला होता. पण भूक जरा कमीच लागत होती. त्यामुळे तो उरला.

खूप गरम होत होते. रात्री मात्र थन्डी वाजायची. दिवसा सुध्धा मधे मधे चांगलं गार व्हायचं. पण एका स्वेटर वर भागलं.

उन्हामुळे डोळ्यांना त्रास होतो. काहीतरी ड्रॉप्स बरोबर ठेवा.

कापराचा चांगला उपयोग होतो. त्रास होतोय असं वाट्लं की हुंगायचा. आम्ही तो छोट्या झिप्लोक पिशव्यांत बरोबर ठेवला होता.

पाणी अआम्ही मिनरलच वापरलं. २५ ते ३० एक बाटली.

एटीएम अ‍ॅक्सिस बँक आणि एस बी आय चं आहे.

क्रेडीट कार्ड फारसं कुठे चालत नाही.

अरे वा ! श्रीनगर, सोनमर्गहून गेलात. मज्जा आहे.
फोटो छान आहेत.

खादाडी : या सीझनमध्ये कुर्मानी नावाचं फळ मिळतं. त्याची इथली रेसिपीही मस्त आहे. खाण्यासाठी चायनीज पद्धतीचं जेवण मिळतं. ढाबे आहेत अधून मधून, मारवाडी लोकांची हॉटेलं आहेत, पण अगदीच टपरीवजा. लेहमधे भरपूर आहे खादाडी. पण जपूनच. सुरुवातीचे चार दिवस तर हलकाच आहार घ्यावा लागतो. हाय अल्टीट्यूड मुळे पचत नाही.