रसीले मरण

Submitted by भरत. on 10 July, 2013 - 03:36

माझिया कंठात गझले तू रुळावे
मी तुला गे, फ़क्त तुजला आळवावे

पदरस्पर्श तेवढ्या अश्रूस व्हावा
थेंब जरि, त्या मोल मोत्याचे मिळावे

येथल्या सार्‍या चुली विझल्या कशाने?
भाकरीस्तव हे हवे तर घर जळावे

आठवांनी मी तिच्या कंटाळलेला
आजच्यापुरते तिने मजला स्मरावे

श्वास शेवटचा तुझ्याच कुशीत घ्यावा
मरणही असले रसीले मज मिळावे

(कतिल शिफाई यांच्या अपने होठों पर सजाना....या गझलेच्या स्वैर अनुवादाचा प्रयत्न)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मतल्यात अनुवाद मंजुघोषा वृत्तात केल्यासारखे वाटले मात्र मग नंतर ते पाळले न गेल्याचे दिसले.

गे, मज, तुजला हे खटकले.

तरीही, शेवटच्या शेरातला भाव अर्थाच्या अधिक जवळ जाणारा(इतर अनुवादांच्या तुलनेत) वाटला.

अपने होठोंपर सजाना - अशी ओळ आहे ती मयेकर!

भाकरीस्तव हे हवे तर घर जळावे<<< व्वा, काय ओळ सुचली आहे तुम्हाला! सुंदर!

(स्वतंत्र रचना म्हणून आवडली)

भाकरीस्तव हे हवे तर घर जळावे - ही ओळ अतिशय सुंदर आली आहे.

विदिपा आणि बेफीजींशी सहमत..

भाकरीच्या ओळीवरून मला माझी एक 'सुटी ओळ' आठवली. (सुटे शेर असतात तशी ही सुटी ओळ.) ती अशी -

'कोरडी तर कोरडी पण भाकरी तर दे मला'

हे शिर्षक मी ३ दा रसीले मटण म्हणून वाचलं>>>> मी पण रसीले मट्ण वाचलं. पण उगाच गझलेवर असा प्रतिसाद नको म्हणुन लिहिलं नव्हतं Happy रसीले मटण आणि भाकरी चा शेर आवडला. व्वा!! Proud :

रसीले मरण हे शीर्षक छानच आहे.
भाकरी आणि शेवटचा शेर सर्वात विशेष वाटले.
वृत्ताबाबत सतर्कता बाळगली असती तर अधिक प्रभावी झाली असती ... वैम.

हल्ली काय स्पर्धा लागली आहे का या गझलेचा अनुवाद करायची? नाही, अजूनही काही अनुवाद मायबोलीवर पाहिले म्हणून विचारलं. Lol