हे सखी (गजलेचा स्वैर अनुवाद- एक प्रयत्न)

Submitted by अज्ञात on 10 July, 2013 - 01:19

मूळ गझलेच्या स्वैर अनुवादाचा एक प्रयत्न. गझलेच्या अंगाने लिहिली असली तरी ही निर्दोष गझल नसावी.

क़तील शिफ़ाई यांची मूळ गजल

अपने होंठों पर सजाना चाहता हूँ
आ तुझे मैं गुनगुनाना चाहता हूँ |

कोई आँसू तेरे दामन पर गिराकर
बूँद को मोती बनाना चाहता हूँ |

थक गया मैं करते-करते याद तुझको
अब तुझे मैं याद आना चाहता हूँ |

छा रहा है सारी बस्ती में अँधेरा
रोशनी हो, घर जलाना चाहता हूँ |

आख़री हिचकी तेरे ज़ानों पे आये
मौत भी मैं शायराना चाहता हूँ||

या आधी दोनदा दुरुस्त केली पण समाधान झाले नव्हते. आता शेवटची दुरुस्ती करून टाकली आहे.

हे सखी

हे सखी अधरी तुला शब्दात गुंफू पाहतो मी
आंसवांचे श्वास होऊनी पसभर वाहतो मी

आजवर स्मरले तुला शिणलो कसा मज जाणले मी
आठवावे तू मला आता तरी, सुखवेन मग मी

लोपले तिमिरात अवघे, यातना उश्वास सारे जाळतो मी
ना दिसे कांही तरीही एकटा आधांतरी फिरतोय मी

एक वांछा तू असावी तेवणारी ज्योत मंगळ ह्या तमी
ओळखीची ओळ व्हावी तू ,मरण जगवीन मी

............................अज्ञात (१०/०७/२०१३)

Group content visibility: 
Public - accessible to all site users