तुझ्याआधी

Submitted by पारिजाता on 9 July, 2013 - 09:55

दिवसभर वेगवेगळ्या वाटांनी,
एकमेकांपर्यंत भावना पोचवून,
सगळं अवकाश मालवल्यावर पुन्हा,
मी दिवसाच्या हिशोबाला लागते.
तासा-मिनिटा-क्षणांचे रकाने.
आवेग, रुसवे, तक्रारी, वचनं,
भावना, ठराव आणि कबुल्या
यांच्या असंख्य ओळीनी..
भरत जातात मनाची पानं.

सुखावते रोजच मी या जमाखर्चानंतर.
फक्त..
ते मन आणि डोळे मिटतानाच्या
त्या क्षणी एकच विचार करते.

कशी जगत होते मी?कसे होते दिवस त्यावेळी?
तू येण्याआधी.
तू येण्याआधी..
या मोरपंखी, अफाट वेळाचं..
आणि या अथांग भावनांच्या खेळाचं..
मी नक्की करायचे काय?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy
Mast!!

खूप आभार भारतीताई, आनंदयात्री आणि जाई.
खरं तर ही कविता मला failure वाटतेय. ती भावावस्था, तो magical, dazed feel मी नाही उतरवू शकले यात अजिबातच. ना उपमा आणि twists n turns पण नाहीत. फार सरळ आलं सगळं. पण जशी सुचली तशी इथं लिहीली. Sad
रिया Happy

खरं तर ही कविता मला failure वाटतेय. ती भावावस्था, तो magical, dazed feel मी नाही उतरवू शकले यात >>> पूर्णतः नाही पण बर्‍याच अंशी सहमत. अधिक चांगली होऊ शकली असे वाटते.

Apratim