भोलानाथ !!

Submitted by अनुराधा म्हापणकर on 9 July, 2013 - 02:27

सांग सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ?

पूर येऊन पाणी वाहून
सारंच बुडेल काय ?

.. ढग फुटून पुन्हा पुन्हा
.. फाटेल काय रे आभाळ
.. देव म्हणोनी मिरवताना
.. करशील का रे सांभाळ

माणसाला शिक्षा म्हणून
विपरीत घडेल काय
सांग सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ?

.. जाऊदे पण भोलानाथ
.. तुला काय रे माहीत
.. पूरांमधे वाहून गेलं
.. सगळंच तुझ्यासहीत

स्वर्ग सांग आमच्यासाठी
दार तरी उघडेल काय
सांग सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ?

सांग सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ?
सांग सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ?

अनुराधा म्हापणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users