पुण्यात पडद्यांसाठी चांगले दुकान सुचवा!

Submitted by हर्ट on 8 July, 2013 - 22:26

नमस्कार जनहो.

पुण्यात आम्हाला घराच्या फक्त खिड़क्यांना पडदे करायचे आहेत. हल्ली निरनिराळ्या पद्धतीचे पडदे मिळतात. चांगली दुकाने आणि चांगल्या पद्धतीचे टिकावू ...वापरण्यास सोयीचे असे पडदे सुचवा. फोटो असतील तर डकवा. धन्स.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुमठेकर रोडला स्विटहोम च्या रांगेत आहेत २,३ चांगली दुकानं, पौड रोडला फर्नीशींग मॉल आहे गाडगीळच्या शेजारी, कर्वेरोडला कॉसमॉस आणि अंबरहॉलच्या मधे आहे एक.

मी फॅब इंडीया फॅन आहे , औंध आणि जहांगिर जवळ आहेत २ ब्रांचेस ,डेक्कनमल्टीपेक्स मधे आणि कोरेगाव पार्कला सुध्दा फॅब ची दुकानं आहेत आहेत पण ती लहान व्हर्जन्स आहेत.

बी, धन्यवाद तुमच्या या सर्व धाग्यांमुळे खुप मदत झाली मला.. बहुतेक आपण घर एकाचवेळी घेतलयं Happy
मी तुळशीबाग एरीया मधे बघणार आहे पड्दे

पडद्यासाठी सुचवलं होत ना मागच्या धाग्यावर दुकान. Uhoh
फर्निचर झाल, पडदे झाले.. आता टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन हे तर घ्यावंच लागेल, कि जुनंच वापरणार ?

केजल्समधे पडदे चांगले आहे पण खुप महाग आहेत. आणि डिजाइन्स वगैरे सगळ्या त्याच त्याच आहेत. त्यापेक्षा शिवुन घ्या.

पडद्यासाठी सुचवलं होत ना मागच्या धाग्यावर दुकान.
फर्निचर झाल, पडदे झाले.. आता टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन हे तर घ्यावंच लागेल, कि जुनंच वापरणार ?
>>

घरकामासाठी बाई पाहिजे? असा धागा पण येईलच थोड्यादिवसात.

भांडी, पंखे, लाईटस, कुलुपं, शो पीस, फोटो फ्रेम, डोर बेल, वॉटर फिल्टर, वास्तुशांतीचे सामान, भटजी, महिन्याचे वाण सामान, औषधे, फॅमिली डॉ, पेट डॉ, सोसायटीचे नियम, कन्सल्टंट, वॉचमन, गाडी धुणारा, कामवाली बाई, सामान हलवणारे हमाल, साड्यांना फॉल्-पिको करुन देणारे, उत्तम न्हावी, स्वयंपाकी...
हुश्श... आता एवढेच आठवलेय.
किती धागे काढणार?

डद्यासाठी सुचवलं होत ना मागच्या धाग्यावर दुकान.
फर्निचर झाल, पडदे झाले.. आता टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन हे तर घ्यावंच लागेल, कि जुनंच वापरणार ?
>>
घरकामासाठी बाई पाहिजे? असा धागा पण येईलच थोड्यादिवसात.
भांडी, पंखे, लाईटस, कुलुपं, शो पीस, फोटो फ्रेम, डोर बेल, वॉटर फिल्टर, वास्तुशांतीचे सामान, भटजी, महिन्याचे वाण सामान, औषधे, फॅमिली डॉ, पेट डॉ, सोसायटीचे नियम, कन्सल्टंट, वॉचमन, गाडी धुणारा, कामवाली बाई, सामान हलवणारे हमाल...
हुश्श... आता एवढेच आठवलेय.
किती धागे काढणार?
>>>>>>>

हो न्न्ना!
मी हा धागा पाहील्या पाहिल्या हाच विचार केलेला Uhoh

फॅब इंडिया म्हणजे खादी भांडारात १२ रुपयांना मिळणारा पंचा २५० ला "इकोफ्रेंडली पेपर बॅग"मधे घालून विकणारे फिरंगी अँबियन्सवाले ओवरहाईप्ड देसी दुकान Wink
रच्याकने : दगडू हलवाई गणपतीच्या मागे खादीभांडार आहे पुण्यात.

मी धागे काढतो म्हणजे मला काही धाग्यांचे वेड वगैरे लागले आहे असे नाही. इतके महिने मी इथे येत देखील नव्हतो. मदत हवी आहे म्हणून इथे तुमच्या ज्ञानाचा उपयोग करुन घेत आहे. तुम्हाला गळ घालत नाही की इथे येऊन लिहाच.

Happy

तुम्ही जेंव्हा घर घ्याल तेंव्हा तुम्हाला असेच धागे काढावे लागतील.

तुम्हाला असेच धागे काढावे लागतील.>>> नाहीरे बी.
तु काढलेतच की.
तेच रेफर करु आम्ही. Happy

मी पिम्परीत घेतले पडदे. स्वस्तात मस्त.
जाताना खिडक्यांची लाम्बी रुन्दी घेवुन गेलो.
दरवाज्याची रुंदी मोजुन गेलो होतो.

खिडक्याचे पडदे रेडीमेड मिळाले.
दरवाज्याचे देखील होते रेडीमेड पण मला जो कपडा आवडला होता त्याचे नवह्ते रेडीमेड.
मग बाय ऑर्डर त्याने बनवुन घेतले.
७ दिवस लागले.

बी, आधीच्या एका तुझ्याच धाग्यावर हे लिहिलं होतंच मी. या वेगवेगळ्या धाग्यांमुळे माहिती चांगली मिळत आहे. घर पहावे बांधून हेच या ग्रूपचे नाव असल्याने इथे होम लोनपासून ते होम फर्निशिंगपर्यंतची सर्व माहिती एकत्र मिळू शकेल. शिवाय, तू मायबोलीच्या एकंदर डेटा बँकचा यथास्थित वापर करून घेतोयस हे खरंच चांगलं आहे. Happy

पडद्यासाठी ती नीरजा मागे एकदा मांजरपाटाचं कापड म्हणाली होती. स्वस्त तरीही मस्त असलं. तिला नक्की विचार.

धन्स Happy

खरे तर मला फक्त कापड ह्यावर इथे माहिती नको. मला पडदे कशात ओवायचे. रिंग्स/कड्या लावायच्या की लांबट पट्ट्या? चुन्या पाडायच्या की तसेच लुज ठेवायचे. पातळ बरे की जाड? धुवायला कुठले योग्य? ही सर्व माहिती हवी आहे.

खरे तर तुम्हाला एखाद्या इंटेरिअर डिझायनर ची गरज आहे ते लोक हे सर्व काम करून देतात. आपण फक्त कन्सेप्ट सांगायची आणि बजेट. नो नीड फॉर धागेदोरे.

नाही मामी ती लोक केवढे पैसे आकारतात. आपण अगदी गडगंज संपत्ती असणारे वा अगदी अरसिक नाही आहोत. थोडी माहिती वगैरे काढली की आपणच आपले घर सजवू शकतो. मी जर पुण्यात असतो तर सगळे धागेदोरे हाताशी लागले असते माझ्या.

बी तू पुण्यात नाहीस म्हणूनच डेकोरेटर शोध. तू इथे असतास तर गेलाच असतास स्वतः.
पडद्यांना रिंगा, चुण्या- सगळं काही दुकानदार सांगेल. कोणत्याही दुकानात जा. जवळपास सर्व भाग डेव्हलप झालेले आहेत. त्यासाठी रविवार पेठ वगैरेच गाठायला हवी असे नाही. कोथरूड, पौड, हडपसर, औंध, बालेवाडी, कात्रज- सर्व भागात सर्व काही मिळते.

बी, पडद्यांचं दुकान बघितलंस तरीही तिथल्या शिंप्याला घरी येऊन मापं घ्यायला सांग खिडक्या दरवाजाची. आपण बरेचदा चुकीची मापं घेतो आणि फसायला होतं पडदे आल्यावर (स्वानुभव). खिडक्या दरवाजे उंच असतील तर पडद्यात डायरेक्ट रिबेट मारुन मिळतात तसे पडदे घे. सरकवायला सोयीचे पडतात ते.

लाइफ स्टाइल किंवा तत्सम दुकानात रेडीमेड पडदे चांगले मिळतील. मग काही हाय टेक नाही. दोन हुकांवर पाइप टाकला की पडदे त्यातून घालायचे. बांबूचे चिक्स वगैरे पण लावता येतात किंवा व्हेनिशिअन ब्लाइंडस.

हे मात्र बरे हो, कोणी धागे काढले की काय पी. आर. ओ. आहात? पासुन ते काय बाष्कळपणा आहे, गुगल वापरा असे सल्ले(?) मिळतात.
इतर कोणी धागे काढले की वेगवेगळ्या धाग्यांमुळे माहिती चांगली मिळते, मायबोलीच्या एकंदर डेटा बँकचा यथास्थित वापर होतो. Happy

सहीय!! लगे रहो.

मुम्बईत पडद्याचं कापड विकणार्‍या दुकानातून टेलर घरी पाठवला जातो. तो मापं घेतो. पॅटर्न्स सुचवतो. किती पैसे होतील त्याचा अंदाज देतो. फक्त पडद्यासाठी इंटीरियर डेकोरेटरची गरज आहेच असं नाही. थोडी नेटवर शोधाशोध केलीत तर वेगवेगळॅ पॅटर्न्स सुद्दा कळतील.

बी,
माझा तुमच्यावर काही आक्षेप नाही. तुम्हाला खरंच गरज आहे म्हणुन धागे काढता ते माहिती आहे.
पण इथे प्रतिसाद देणार्‍यांच्या दुट्प्पीपणाचा राग येतो.

तुम्ही घराचे काम करत आहात, ते बहुतेक खुप अन्-ओर्गनाईझ आहे. आधी लागणार्‍या गोष्टींची यादी करा. प्राधान्यक्रम ठरवा नि कामाला लागा. तुमच्या एकंदर पध्द्तीवरुन असे वाटतेय की एक झाली, आता अडकलो, कोणीतरी सांगा, मग पुढे, परत अडथळा, पुन्हा तेच.

तुम्ही सुजाण आहात. याचा तुम्हालाच फायदा होईल. Happy

नामणदिवा, बीने इथे माहिती विचारायला बाफ काढलाय. पीआरओ वाल्यांचे बाफ वेगळे आहेत, त्यांनी माहिती विचारायला बाफ काढूदेत की!! शिवाय तिथे पण त्यांना बाफ काढू नका म्हटलेलं नाही फक्त तुम्ही "पीआरओ आहात का?" असं विचारलंय. ते का विचारलंय ते तुम्हाला समजायचं नाही. त्यामुळे ते असोच.

बी, तू टेन्शन घेऊ नको रे. Happy

रेडीमेड पडदे खरच छान मिळतात हल्ली आणि स्वस्तातही असतात. त्यामुळे कापड निवडा, शिवायला टाका, आणायला जा हा वेळ वाचतो.

Pages