तुझे डोळे

Submitted by डॉ अशोक on 7 July, 2013 - 07:15

तुझे डोळे

लावून खाली नजर, बघतात डोळे तुझे
काम लाख शब्दांचे, करतात डोळे तुझे.
*
लपविले मी मलाही, माहीत मी न मजला
तळ गाठण्या मनाचा, घुसतात डोळे तुझे
*
सुख मी कवेत घेता, थरथरून ओठ गेले
घेऊन उंच झोका, झुलतात डोळे तुझे
*
वादळे आठवांची, गाठती सांजवेळी
मिटूनी पापण्यांना, झुरतात डोळे तुझे
*
असो दे मेनका वा, असू दे अन्य कोणी
आगळी तू वेगळी, खुलतात डोळे तुझे

-अशोक

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही