हे 'असं' असावं...

Submitted by बागेश्री on 2 July, 2013 - 12:23

असमाधानाची जळमटे नाहीत
अस्वस्थतेची धूळ नाही..!
आठवणींचा बोचरा वारा नाही अन्
खारट पाण्याची डबकीही...... नाहीतच

गंजलेली शस्त्र नाहीत, की
जीर्ण झालेली वस्त्रदेखील.... नाहीत!

सगळं कसं स्वच्छ... नेटकं..

दारात सुबक रांगोळी..
सताड उघडी तावदानं,
नितळ सूर्यप्रकाश,
आत- बाहेर उनाड खेळता वारा..
फुलांचे सुवास,
सजीवतेचा मंगल भास..

छे!
हे माझं मन नसावंच....

परवा जाता जाता,
काही विसरून गेला आहेस का?     

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy
मस्त!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

"बागेश्री" नावं वाचुन धागा उघडलेला आणि त्याचं सार्थक झालंच!

रच्याकने इथे मी "तो" म्हणजे पाऊस न घेता माझा सखा म्हणुन घेतला बरका Wink

इतकी आवडली कविता की दोनदा पडला प्रतिसाद Proud
रच्याकने जितक्यांदा कविता वाचली तितक्यांदा प्रतिसाद द्यायचा झाला तर कसं होणार माझ्यामुळे तुझ्या लेखनाचं Proud

हे माझं मन नसावंच....>>> हे माझं मनच नसावं अशी वाचली ही ओळ.

छान कविता, विशेषत: मांडण्याची शैली!

धन्यवाद...
रियू, ह्यावेळी पावसाला उद्देशून नव्हतंच बरं हे, तू सही ट्रॅक पर है Wink

विदिपा,
त्या "चं" मुळे खात्री व्यक्त झालीये ना?
ते माझं नसल्याचीच, खात्री!

मी गंडलो या वेळी...
शेवटचा ट्विस्ट सुटला माझ्या नजरेतून. पण जिथपर्यंतची कविता मला पोहोचली..ती ही आवडलीच.

वाह............
मस्तच एकदम............. शेवटच्या वाक्याने तर कळसच गाठला.......... Happy