पालखीचा सोहळा

Submitted by अनिल तापकीर on 2 July, 2013 - 11:44

पालखीचा सोहळा |
असे आगळा वेगळा |
विसरे घरादाराला |
वारकरी भोळा ||

माथा गंधाचा टिळा |
गळा शोभे तुळशीमाळा |
नाम घेई वेळोवेळा |
वारकरी भोळा ||

चालला वारकऱ्यांचा मेळा |
लागली आस डोळा |
कधी पाहीन सावळा |
पंढरीचा ||

ज्ञानदेवांच्या संगती |
बेभान पाऊले पडती |
विठूरायाची महती |
मुखाने गात चालती ||

ऐसा सोहळा अलौकिक
नाही दुजा आणिक एक |
अनुभवाया सारे भाविक |
वाट चाले पंढरीची ||

Group content visibility: 
Public - accessible to all site users