खरा `ग्रीन टी' - गवती चहा

Submitted by Mandar Katre on 1 July, 2013 - 07:52

खरा `ग्रीन टी' प्यायचा असल्यास, `गवती चहा' (चहा पत्ती) आणि `पुदिना' ची जुडी विकत आणा, पुदिना कमी टाका (अगदी नावाला), त्यात थोडे आले टाका आणि साखर टाका, आणि मस्त उकळून प्या.
मी माझ्या साठी आमच्या ऑफिसातल्या गार्डन मधून रोज गवती चहा आणून माणसाला माझ्यासाठी असा चहा बनवायला सांगायचो आणि प्यायचो. आज पूर्ण ऑफिस फक्त हाच चहा प्यायला लागले.
विकत चहा आणि दुध आणायचे बंद झाले आणि कंपनीचे पैसे वाचवले. बॉस लगेच `गार्डन चा एक भाग गवती चहा ने भरून टाका' असा आदेश देऊन मोकळा झाला.
पण खरच सगळे खुश आहेत.

१) चहा-पावडर बनवणाऱ्या कंपन्या आपोआप त्यांच्या पावडरचा भाव कमी करतील
२) चहा-पट्टी (गवती चहा) साधारण खूपच गरीब लोकांचे आणि शेतकऱ्यांचे पीक आहे, त्यांच्या पिकांना भाव येईल. हा गवती चहा महाराष्ट्रात-गुजरात मध्ये आणि खूप कमी ठिकाणी मिळतो, त्यामुळे आपल्या गरीब शेतकऱ्यांना फायदा होईल.
३) दुधाचा भाव कमी होईल.
४) गवती चहा प्यायल्या मुळे तुमच्या शरीरात रक्त-प्रवाह सुरळीत होतो, हार्ट एकदम चांगले काम करते.
५) रोज गवती चहा पिणाऱ्यांना कधीही कॅन्सर होत नाही.

साभार-अभय जोशी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या 'खर्‍या ग्रीन टी' ची रेसिपी वाचून जपानात कितीतरी लोकं आत्महत्या करतील. त्याचं काय?
खोटा ग्रीन टी जपानमध्ये जो पिकवतात, विकतात, पितात तो.

आज जरा मजा करावी वाटत आहे.

<<सायो - ते सगळं खरं हो. पण 'खरा' वगैरे लेबलं नका लावू.>> नाही नाही...बिनधास्तपणे 'खरा' हे विषेशण लावा. अगदीच वाटले तर तळटीप लिहा खरा हे ब्रँड-नेम आहे.

<<भरत मयेकर- झाला तर उपचारांचा खर्च देणार का?>> त्यासाठी तुम्हाला मंदार कात्रे यांचेकडूनच (की अभय जोशी) गवती चहा विकत घ्यायला लागेल दरोरोजच.

<<किशोरे - दुर्वा उकळया तर चालतील का ???? >> का नाही? अगदी नुसत्या खाल्ल्या तरी चालतील.

ता. क. - आमच्या बागेत गवती चहा होता, आता नाही आहे.

सायो, जपान्यांचं उदाहरण का दिलंस? आता "ते पाश्चिमात्य खूळ आहे" असं म्हणता येणार नाही की गं. भौगोलिक गोची झाली. Light 1

मंदार कात्रे,

+ १०० Happy

गवती चहा बद्दल तुमचे वैद्यकीय विष्लेशण ठीकच आहे.

फरक फक्त एव्हढाच आहे कि तुमच्या ह्या वरील लेखनाने तुम्हाला कडक चहा प्यायची आवड दिसते.

ह्या चहाच्या पिकाबद्दल तुमचे मत १००% मान्य आहे.

बाजारात जो चहा ज्या-ज्या पद्धतिने मिळतो तो मी स्वतः पाहिला आहे त्यांच्या-त्यांच्या so called manufacturing plants मध्ये.

काही-काही युनिट्स मध्ये आम्ही जेव्हा ऑडिट केलेले आहेत आणी तेही अनपेक्षित रितीने

(un-announced audits ) कारण असे करणे हे त्या प्रॉडक्ट्स च्या खरेदी ( importers ), करांची

मागणी वा त्यांच्या नियमावलित असते, तेव्हा त्या वेळेस बरेच काही उघडकीस येते.

म्हणुन मी तुमच्या मतांशी सहमत आहे.

चहा-पट्टी (गवती चहा) साधारण खूपच गरीब लोकांचे आणि शेतकऱ्यांचे पीक आहे, त्यांच्या पिकांना भाव येईल. हा गवती चहा महाराष्ट्रात-गुजरात मध्ये आणि खूप कमी ठिकाणी मिळतो, त्यामुळे आपल्या गरीब शेतकऱ्यांना फायदा होईल.
>>>>

नक्की कुठल्या भागातले शेतकरी गवती चहाचे 'उत्पादन' घेतात?

अती वर्जच - हाच चहा जर दिवसातन १० वेळा पिला तर नक्कीच त्रास संभवतो.

सुरवातीला लोक दिवसातुन २ वेळा चहा घेत असत. पुढे काय झाल ?

<५) रोज गवती चहा पिणाऱ्यांना कधीही कॅन्सर होत नाही<> झाला तर उपचारांचा खर्च देणार का?

नक्किच, पण तुम्ही अगदी लहानपणापासुन रोज पित असाल तरच Lol

खोटा ग्रीन टी डब्बाबंद असतो. आजकाल ते टीबॅग्जमध्ये पण देतात. चव कडवट आणि नकोशी वाटणारी, पण कोरियन लोक्म आनंदाने पितात. Sad

गवती चहा बघावा लागेल इथे मिळतो का ते.

अवांतर :- दुर्वा/ गव्हांकुर रस करुन पितात का? की नुस्तेच खाल्ले तरी चालते ?

गवती चहा लहानपणी आमच्या बागेत होता. सर्दी, खोकला झाला कि गवती चहा बनवला जायचा. अनुभव चांगलेच आहेत. ब-याच जणांचं मत चांगलं आहे गवती चहाबद्दल. फक्त सर्वांनाच तसा अनुभव येतो कि नाही याबद्दल कल्पना नसल्याने ठाम विधानं करणं अवघड आहे. त्या दृष्टीने संशोधन झालेलं असल्यास गवती चहाला मान्यता मिळेल.
(ग्रीन टी वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेला आहे कि नाही याची कल्पना नाही. बरेच जण वजन उतरवण्यासाठी घेतात हे ऐकून आहे)

मी फॅब इंन्डियाचा ग्रीन टी आणला होता. तर चक्क तुळशीची पानं वाळवून चुरा करून डब्यात भरलेली. त्याचा चहा काही पिऊ शकले नाही. चमत्कारिक चव(हेमावैम)

अवांतर . . . .

आम्ही सध्या जसा ईथे घरी चहा पितो तो असा कि, पाणी कमीत कमी ५ मिनीटे उकळत राहु देतो ( स्टेनलेस स्टीलच्या पात्रात फक्त, ऑफिस मध्ये केटली आहे विजेवर चालणारी त्यामुळे ते जास्तच सोईस्कर आहे ).

नंतर गॅस बंद करुन त्या पाण्यात फक्त अर्धा चमचा ( टी स्पून ), चहाची वाळलेली पानांचे छोटे तुकडे ( फ्लेक्स म्हंटले तर चालेल ), टाकतो आणी झाकुन ठेवतो.

ठीक दोन मिनिटांनी ते गाळुन कपात घेतो. फक्त चवीपुरती दोन चिमुट म्हंटल्यासारची साखर टाकुन ते घोळतो.
ह्या चहाची चव मला सर्वांत जास्त चांगली वाटते. आणी हा चहा दिवसातुन कितीही वेळा आपण प्यायलो तरी काही हानी नसते.

काही लोक ईथे त्याला लिकर टी म्हणतात.

कारण माझे मत आहे कि चहा अगदी कडक आणी तोही जर त्यात दूध टाकुन घेतला तर माणसाची नमस्ते होऊ शकते Happy म्हणजे त्रास होऊ शकतो, आज ना उद्या.
कारण दूध टाकुन अथवा धूधालाच उकळवुन चहा बनवतातच पण खरे तर शरीराला तो जास्त उपयुक्त नसतो.

आणखीन एक गोष्ट आपणांबरोबर ईथे वाटुन घेतो . . . .

टी बॅग्स ला जे दोरे लावलेले असतात ते दोरे बनवतांना मनुष्य शरीराला पौष्टीक तर नाहीच, तरी हानी कारक रसायने अथवा तत्सम काही पदार्थ वापरलेले नसतील ह्याची काहिच शाश्वती नसते, म्हणायला फक्त म्हणतात कि अश्या प्रकारे उपयोगात येणारे दोरे अति सावधानतेने अश्या हानीकारक रहित पदार्थ वापरुन बनवले आहेत पण तसे नाही अगदी.

हे दोरे बनवतांना ते सारखे अटकुन तुटू नयेत, त्यांचे अतिशय तलम ( स्मूथ ), प्रकारे कारखान्यांत चलवलन व्हावे त्या मशीन्स वरती ह्या करीता काही तैल पदार्थ ( ल्युब्रिकेशन्स, ह्याने दोर्‍यांचे वजन वाढवायला ही मदत होतेच ), वापरलेले असतातच, हे पदार्थ जेव्हा आपण टी बॅग्स मजेने बुडवुन बुडवुन काढतो त्या गरमा गरम पाण्यामधुन चहा घोळला जावा म्हणुन तेव्हा हे सुद्धा त्या पाण्यात मिश्रीत होतच असतात.
ही गोष्ट आम्ही काही व्यावसायिक ( प्रोफेशनल्स ), टी-टेस्टर्स कडुनही पडताळुन पाहिली, कारण ते खरोखर अचुक रितीने हा फरक ओळखु शकले होते.

आणखीन एक : ह्या लिकर टीमध्ये कधी एक-दोन लवंगा ठेचुन पाणी कपात घेतांना टाकुन बघा चव कशी वाटते . . . . खरे तर मंदार कात्रे ह्यांनी सांगितलेला गवती चहा सुद्धा मी असाच पितो आणी तो मला तरी खूपच उत्कृष्ट वाटतो.

गवतीचहा, हिरवा चहा या दोहोंतही फ्लॅव्हनॉइड या गटातली रसायनं असतात. अँटिऑक्सिडंट म्हणून ती काम करतात. त्यामुळेच त्यांच्यात काही चांगले गुण आहेत. चहात दूध घातलं की चहातल्या प्रथिनांशी या रसायनांचा संयोग होतो, आणि त्यांचे चांगले गुणधर्म नष्ट होतात.