"उदाहरणार्थ एक" नाटक- मराठी कला मंडळ, वॉशिंग्टन डीसी.

Submitted by लोला on 30 June, 2013 - 17:12

मराठी कला मंडळ - वॉशिंग्टन डीसी सादर करीत आहे.

"उदाहरणार्थ एक"

शनिवार दिनांक ६ जुलै २०१३ रोजी दुपारी ४:३० वाजता.

Saturday, July 6th at 4.30 PM (Track 2)

BMM U1 July 2013.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जयदिप जोशी हे नाव ओळखिचं वाटतय... हे नाटक बहुतेक आमच्या कॉलेजने फिरोदिया करंडक स्पर्धेत सादर करुन सांघिक दुसरा क्रमांक मिळ्वला होता... रिकॉर्डिंग करा..

शुभेच्छा... Happy

पग्या.. समीर कुलकर्णींची संकल्पना म्हणजे तेच असावे..
बालगंधर्वचा प्रोफेशनल शो आठवत नाहीये का तुला, इंटरनेटच्या नाटका बरोबर केलेला???
आणि वैयक्तिक ११ तरीही सांघिक दुसरा असं आहे ते...

रेकॉर्डिंग नक्कीच करा.. बघायला नक्की आवडेल..

आणि नाटकास शुभेच्छा..

मी वृत्तांत लिहीणार आहे. सचित्र.>> वा वा वा फारच छान. लोला स्टैलीत लिहिलेला वृ. वाचायला फार आवडेल.

अर्रर्र... मेलांज आणि उदाहर्णाथ एक एकाच वेळेस का??? महेश काळेला नाटक बघायला नक्कीच आवडलं असतं.. त्यानी गाजवलं होतं नाटक..

मेलांजला उशीर झाल्याने आमचे नाटक हाऊसफुल्ल झाले. Wink
मी आधी बॅकस्टेजला मदत करत होते. मग थोडी उरलेली फ्लायर्स बाहेर दिली तेव्हा "तिकडे उशीर होणार आहे आधी नाटक बघा" असं सांगून काही लोकांना नाटकाला पाठवले. Proud
मी आधी पाहिले असल्याने अर्धे बघून मेलांजला गेले.

udk1.jpgudk4.jpg

अप्रतीम झालं नाटक. विषय अमेरिकेतील लोकांना भावणारा होता. अभिनय, संगीत सगळंच छान होतं. प्र.दा.च्या कार्यक्रमासाठी खरं तर बरेच लोक आले पण नाटकाने खिळवून ठेवलं. शेवटी standing ovation मिळालं नाटकाला. सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन !!

नाटकात एक लग्न आहे ते कसं दाखवलं?

आम्ही केलं होतं तेव्हा प्रत्यक्ष स्टेज वर लग्न लावून प्रेक्षकात पहिल्या दोन रांगात पेढे वाटले होते..

आणि गाणी कोणकोणती होती??

नाटकात actual लग्न लावताना नाही दाखवलं. नायक नायिकेला लग्नाची मागणी घालतो आणि ती होकार देते एवढंच दाखवलं होतं. पाऊस दाटलेला, अगं अगं पोरी फसलीस गं, मेरी सोनी, जुन्या गाण्यांची मेडली आणि जिवलगा ही गाणी होती. पण situation प्रमाणे चपखल बसवली होती. अगदी फिरोदिया बघतोय असं वाटलं Happy

खरंय फिरोदीयाची आठवण झाली खरी. परंतु कथानक पूर्णपणे वेगळं होतं असं वाटतं, बहुदा नव्याने पुन्हा लिहिलं असण्याची शक्यता आहे. प्रयोग उत्तम झाला. व्यावसायिक स्तरावरचा झाला. सेटही उत्तम होता तसेच सगळ्यांची कामेही छानच झाली.