आस..............

Submitted by अनिल आठलेकर on 28 June, 2013 - 16:02

जगण्याच्या उर्मीपायी
मी जन्म लाखदा घेतो.....
मरणाने सरते काया
मी इच्छेने अंकुरतो..........

स्वप्नांहून सुंदर जेंव्हा
सहवास निशेचा होतो
चुकण्याची नसते चिंता
मी त्याच दिशेचा होतो ....

या पाउलवाटा सगळ्या
जाणून सुखाच्या घेतो
तो येण्याआधी चकवा
मी हमरस्त्याचा होतो....

आसक्त स्पर्श स्वप्नांचे
मी क्षणोक्षणी अनुभवतो...
अन पुन्हा नवे जगताना
मी आठवणींचा होतो............!!

___अनिल आठलेकर...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम रे
पण कडवे क्र ३ पहिल्या २ व नंतरच्या २ ओळीतली सुसंगती समजली नाही बघ मलातरी ..म्हणजे ...तो चकवा येण्याआधीच मी हमरस्त्याचा होतो असे आहे का ..."तो" हा शब्द चकव्यासाठी आहे का ...हा चकवा सुखांचा आहे का ...आणि या हमरस्त्याची नेमकी भूमिका काय आहे या स्टोरीतली ...हा एकदम कसा काय आला इथे ....पाहुणा कलाकार आहे का हा .....

गम्मत केली ...
मस्तच आहे ही कविता Happy Happy Happy