निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.
आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर
स्निग्धा, खूपच गोड फोटो आहे
स्निग्धा, खूपच गोड फोटो आहे
परकर पोलक्यात तर अगदी मुक्ताबाईच वाटतीये ....>>>>+१
मस्त ट्युलिप्स..
मस्त ट्युलिप्स.. ट्यूलिप्सच्या क्षितिजापर्यंत पोचलेल्या शेतात ह्या जन्मात एकदातरी मला जाता यावे ही इच्छा मनाशी बाळगुन आहे...
मस्त ट्युलिप्स.>>>>> +१
मस्त ट्युलिप्स.>>>>> +१
ट्यूलिप्सच्या क्षितिजापर्यंत पोचलेल्या शेतात ह्या जन्मात एकदातरी मला जाता यावे ही इच्छा मनाशी बाळगुन आहे... स्मित>>>>>>>>>.बालिके, तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल.
स्निग्धा, कसली गोड आहे ग तुझी
स्निग्धा, कसली गोड आहे ग तुझी लेक.
<<<<मस्त ट्युलिप्स.. ट्यूलिप्सच्या क्षितिजापर्यंत पोचलेल्या शेतात ह्या जन्मात एकदातरी मला जाता यावे ही इच्छा मनाशी बाळगुन आहे... स्मित >>>>.साधना, सेम टु सेम हिअर!!!!!
बालिके, तुझी इच्छा लवकरच
बालिके, तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल
धन्यवाद माताजी..
स्निग्धा, मुक्ताबाई खूप गोड
स्निग्धा, मुक्ताबाई खूप गोड आहे .
काल पूलगेट ते हडपसर आणि पुढे
काल पूलगेट ते हडपसर आणि पुढे देवाची उरूळीपर्यंत वारीला जाऊन आलो.
असं म्हणतात "एक तरी ओवी अनुभवावी" तसचं "एक तरी वारी नक्कीच अनुभवावी.."
स्निग्धा, मुक्ताबाई खूप गोड
स्निग्धा, मुक्ताबाई खूप गोड आहे .
छान फोटो आलाय.
जागु,
फुलाचा फोटो छान आलाय !
वर्षु,
अरे वा !काउंट डाऊन दिवसांचा कि तासांचा ?
उजू, संपर्कातून मेल
उजू, संपर्कातून मेल केलाय.
मागे शांकलीनेच ना, झाडांच्या नावावरून गावांच्या नावाबद्दल लिहिले होते ? आपण अशावेळी फक्त मराठीचाच विचार करतो पण अशी पद्धत सर्वच भाषांत आहे.
आगरतळा, हे नाव पण अगर नावाच्या सुगंधी झाडावरून पडलेय. हे अगर म्हणजे जिलेटीन वाले अगर नाही तर अगरबत्ती वाले अगर. या झाडाची राळ खुप सुगंधी असते. मस्कतमधल्या डोंगराळ भागातही याची खुप झाडे आहेत. आणि तिथे ते फार लोकप्रिय आहे. याचा धुर, धुपाटण्याने कपड्यांच्या आत घेतला तर अंघोळीची गरज रहात नाही.
दुसरे एक नाव आहे गुवाहाटी ( आपल्या शालेय पुस्तकात ते गौहत्ती असे चुकीचे लिहिलेले असे. गुवा म्हणजे सुपारी. आणि सुपारीचा बाजार ते गुवाहाटी. असममधे सुपारी फारच लोकप्रिय आहे पण त्यांची संस्कारीत ( म्हणजे मातीत किंवा पाण्यात चार सहा महिने कुजवलेली ) सुपारी आपण कणभर देखील खाऊ शकत नाही.
जिप्सी, अनिल, उजु...
जिप्सी, अनिल, उजु... सगळ्यांना खुप खुप धन्यवाद. काल योगायोगाने तिच्या शाळेतही दिंडी होती आणि सगळे वारकरी पुण्यातून पुढे मार्गस्थ होणार होते म्हणुन निगकरांबरोबर फोटो शेअर करावासा वाटला.
दिनेशदा, आपल्याला रविवारी एका
दिनेशदा, आपल्याला रविवारी एका दिवसात, आंबोलीला जाऊन येता येईल का?
शोभा, बहुतेक जण नाहीच
शोभा, बहुतेक जण नाहीच म्हणताहेत. मी अनिलच्या शेतावर जाणार आहे. रात्री पुणे मिरज असा प्रवास करु.
मग मी पुढे कोकणात जाणार आहे. अनिलची फॅमिली असेल. तूम्हाला सोबत होईल. येणार का ?
मला रजा मिळणार नाही. फ़क्त
मला रजा मिळणार नाही. फ़क्त रविवारीच सुट्टी आहे.
अनिलची तयारी असेल तर
अनिलची तयारी असेल तर रविवारीही त्याच्याकडे जाता येईल. मिरज पुणे अंतर फार नाही. शनिवारी रात्रीच्या महालक्ष्मीने निघून, रविवारी सकाळी त्याच्याकडे आणि मग तिथून दुपारी निघून परत पुण्याला येऊ शकाल.
ते जमणारे असेल तर मी पण प्लान बदलेन.
प्रज्ञाला विचारते. ती येत
प्रज्ञाला विचारते. ती येत असेल तर बघू.
मी पण रविवारी दुपारी तिथे
मी पण रविवारी दुपारी तिथे येईन. मग तिथून कोल्हापूर व परत पुणे असेही करता येईल.
पुण्यात ज्यांना भेटायचे आहे त्यांना रविवारी संध्याकाळी भेटेन.
मला रविवारी बाहेर जायचे आहे.
मला रविवारी बाहेर जायचे आहे. त्यामुळे बाहेरगावी यायला नाही जमणार
सुप्रभात. दा, संपर्कातून
सुप्रभात.
दा, संपर्कातून रिप्लाय केला आहे.
गुवाहाटीबद्दल आसामबद्दल
गुवाहाटीबद्दल आसामबद्दल इरावती कर्वेंनी खूप खूप छान लिहिले आहे त्यांच्या एका पुस्तकात. सध्या नाव आठवत नाही.
हाट म्हणजे बाजर. गुवा म्हणजे सुपारी.
मला गटगला यायला नाही जमणार.
मला गटगला यायला नाही जमणार.
काल मी काकडी, कारली, चवळी, भोपळ्याच्या बिया पेरल्या आहेत. मागील आठवड्यात भेंडी आणि गवारीच्या लावल्या होत्या त्यांची रोपे बाहेर आली आहेत.
माझ्याकडे १३/१४ जूनला एका
माझ्याकडे १३/१४ जूनला एका गुलाबावर फ़ुल फ़ुलल त्याचा मी १६.०६.१३ ला फ़ोटो काढला. तो हा.
आणि त्याच फुलाचा १.०७.१३ ला काढलेला हा फोटो. रंगात फरक पडलाय तो माझ्या फोटो काढण्यामुळे. अजूनही ते चांगले आहे.
नमस्कार!!! मागच्या महीन्यात
नमस्कार!!!
मागच्या महीन्यात आंबे खाऊन सोसायटी आवारात कोयी टाकल्या होत्या. १०-१२ कोयी रूजून पाने फुटली आहेत. आता श्रावाणातली पूजा, गणपती आणि नवरात्रीची काळजी मिटली.
मागच्या महीन्यात आंबे खाऊन
मागच्या महीन्यात आंबे खाऊन सोसायटी आवारात कोयी टाकल्या होत्या. १०-१२ कोयी रूजून पाने फुटली आहेत. आता श्रावाणातली पूजा, गणपती आणि नवरात्रीची काळजी मिटली.>>>>>>>>>>>>>>व्वा!
आम्ही एक, नारळी आंब्याची कोय, रुजवायची म्हणून ठेवली होती. ती आता आहे की नाही हे बघावेच लागेल.
अरे, मला कुणीतरी सांगा की
अरे, मला कुणीतरी सांगा की पुण्यात गटग कधी आहे?????///
पुण्यात गटग कधी
पुण्यात गटग कधी आहे?>>>>>>>>>> खरंच पुण्यात नक्की कधी भेटायचं आहे? शुक्रवारी की रविवारी?
शोभा मस्तच गं फूल,,, तिकडे
शोभा मस्तच गं फूल,,,
तिकडे आल्यावर रोपं,बिया रुजवायची आधिकृत शिकवण लावून घेईन म्हण्तेय....
बोलो कौन राजी है ए बीसी सीखानेको????????????????????
जागु आणि मानुषी कडे जा...
जागु आणि मानुषी कडे जा... बदल्यात त्यांना चायनीज च्यावच्याव शिकव...
सुप्रभात. वर्षूताई तू तर
सुप्रभात.
वर्षूताई तू तर येणारच आहेस माझ्याकडे .
सुदुपार. जागू, कसलं फुल आहे
सुदुपार.
जागू, कसलं फुल आहे हे?
खरंच पुण्यात नक्की कधी भेटायचं आहे? शुक्रवारी की रविवारी?>>>>>>>>>>>>>>>दिनेशदा, अनिलच्या शेतावर जाणार आहेत. आपल्या कुणाला जमत असेल तर जायच आहे. त्यामुळे ते बहुधा शुक्रवारीच भेटतील.
दिंडी चालली
दिंडी चालली चालली...
http://www.maayboli.com/node/43963
Pages