निसर्गाच्या गप्पा (भाग - १५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 June, 2013 - 03:52

निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.

आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु/साधना
चला मला एकररी गोष्ट नीट येते अस म्हणता येइल्..तो मोगर्‍याचा वळेसर येतो मला....

ट्रेन मध्ये शिकलेला..

<<केसात झोकदार वेणी माळायची फ्याशन शहरात पुन्हा सुरू व्हायला हवी !<< +११११११ Happy

<बहिणीच्या कंपाउंडात लाल गुंजांचं आणि कैलाशपतीचं झाड आहे.
<<
अरे व्वा...मला हवय गुंजेचं आणि कैलाशपतीचं रोप.
पण कैलाशपतीचं झाड खुप मोठं होत असेल ना?

ही कालची वेणी बाजारातूनच देवीसाठी घेतलेली.

ह्यात बघा लोकरीचे धागे आणि मी जो इंग्लिश पाला म्हणते तो आहे. हा इंग्लिश पाला खुप महाग मिळायचा आधी. काही बायकांना स्टेटस म्हणून महाग घालून मिरवायची सवय असायची मग त्या नुसत्या ह्या पाल्याचा गजराही ऑर्डर देउन करून घ्यायच्या. ५-६ वर्षांपूर्वी त्या गजर्‍याची किंमत १०० ते १५० रु. होती.

लेखासाठी मला थोडा वेळ द्या कारण मला अजुन कंठी पण शिकायची आहे.

आगरी बायकाना सगळ्याचाच जाम सोस असतो..... त्यांच्या एका लग्नात मी गेले होते. त्यांचे दागिने, केसात घातलेले गजरे आणि इतर काही गोष्टी ज्या अशा वापरतात हे मला माहितही नव्हते, त्यांच्या साड्या... आपण फक्त बाबौ!! बाबौ!! बाबौ!! करत बसायचे... Happy

मुलींनो आता फटाफट विडिओ टाका आपल्याला काय काय येते त्याचे..

शोभा कुरिअर केलेस की नाही?? की फक्त नावेच टाकलीस??

वरती 'मामी' यांनी बरोबर लिहिलेय, इथे मद्रासी गजरा म्हणून डोंबिवलीत मिळतो तो म्हणजेच 'कदंबा'. फुटाच्या हिशोबाने विकतात. केस लांब होते तेव्हा कॉलेजात असताना रोज घालायची.

पण या वेळेस पुण्याला यायला नाही जमणार. >>>>>>>>पुणेकर, चला आंदोलन करुया. Happy
शोभा कुरिअर केलेस की नाही?? की फक्त नावेच टाकलीस??>>>>>>>>>>केलं केलं. मिळालं की सांग. Happy

जागू, ती पाने शतावरीसारखी दिसताहेत.

आणखी एक झाड असते. ते सूचीपर्णी झुडूप असते त्याची पाने पण अशीच दिसतात फक्त ती जाड असतात. ती पाने पुष्प सजावटीत खूप वापरली जातात.

<बहिणीच्या कंपाउंडात लाल गुंजांचं आणि कैलाशपतीचं झाड आहे.
<<
अरे व्वा...मला हवय गुंजेचं आणि कैलाशपतीचं रोप.
पण कैलाशपतीचं झाड खुप मोठं होत असेल ना?

>>>>> चिक्कार! Happy

मामी मी तुझ्या आईच्या जवळ राहत असते तर तिच्याकडूनच शिकले असते ग.

कैलाशपतीच झाड अवाच्या सवा मोठ होत.

कैलाशपती कशाला लावता? फुले सुंदर असतात पण त्याचे कॅनन बॉल्स खाली पडुन फुटतात आणि भयानक दुर्गंधी सुटते. आणि खरेच कॅनन बॉल्स असतात ते....

मी हा धागा नियमित पाहत नाही.पण जेन्व्हा पाह्ते तेन्व्हा खुप आनंद मिळतो.
मंगला नारळिकर यांच' पाहिलेले देश भेटलेलि माणस' हे राजहंस प्राकाशनच पुस्तक वाचल आणि तुम्हा निसर्ग प्रेमींची आठवण झाली.
मंगला नारळिकर यानी वेगवेगळे देश फिरताना पाहिलेली तिथली झाडे,झुडपे,प्राणी पक्षी यांचे खुप छान वर्णन केले आहे.

Pages