निसर्गाच्या गप्पा (भाग - १५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 June, 2013 - 03:52

निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.

आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ABC 2.jpg

आ़ज मला सीतेचे आसव या नविन फुला बद्दल माहिती कळ्ली, इथे शेयर करावीशी वाटली. या फुलच्या फिकट जांभळ्या रंगाचे रह्स्य वाचुन थक्क व्हायला झाल.

गेल्या एप्रिल पासून मुक्काम लाइप्झिग पूर्व जर्मनी इथे आहे. http://mimarathi.net/node/10992 इथे इथल्या निसर्गा बद्द्ल थोड लिहिलय. आधीच्या भागा ची लिंक प्रत्येक भागाच्या सुरुवातीला च तुम्हाला दिसेलच. कॉपी पेस्ट करून मा बो वर ही लिहायला हव होत पण कंटाळा केला या बद्दल माफी असावी. आणखी खूप फोटो आहेत त्यातले आपल्या नि ग च्या धाग्यावर टाकण्या सारखे इथे टाकेन त्यासाठी आज मुद्दाम http://www.maayboli.com/node/43465 हा धागा शोधुन नव्या तर्‍हेने फोटो कसे टाकायचे ते शिकलो. आता वेळ काढून एक एक टाकत जाईन.

सुरुवात या शेतातून वेचलेल्या या ताज्या स्ट्रॉबेरी नी . कामावरन घरी परत येताना शेताजवळ थांबलो म्हातारे शेतकरी बुवा व आजीबाई रस्त्यालगत एका टपरीत बसलेले होते. त्यांनी विचारल की पॅक हवा की वेचणार? आम्ही म्हटल वेचूया. भोवती छोटी मुल आपल्या आईबाबांबरोबर स्ट्रॉबेरी वेचायला आली होती त्यांचा फुल्ल दंगा सुरु होता. स्ट्रॉबेरी वेचून खायला बडा मजा आला. फक्त तीन युरो घेतले शेतकरी बुवांनी अन एक किलो स्ट्रॉबेरी वेचतांना किती खाल्या याची गणती नाही. पिकलेल्या स्ट्रॉबेरी जर आकारानी लहान असल्या तर जास्त गोड असतात मोठाल्या दिसायला जरी छान असल्या तरी जरा आंबटगोड लागतात असा शोध शेतात त्या वेचून खाताना मला लागला.

श्री, मस्तच आहेत स्ट्रॉबेरीज. न्यू झीलंडमधेही असेच करतात. त्यांच्याकडे ही पिके खुडण्यासाठी माणसे नसतात. आपली आपण खुडली तर त्यांची विक्रीही होते आणि पिके वाया जात नाहीत.

आपल्याकडे मात्र मुद्दाम जंगलात शिरुन करवंदे / जांभळे तोडण्यापेक्षा एखाद्या गिरीजनाला त्याचे वेचण्याचे पैसे देणे मला योग्य वाटते.

सायली, या फुलांना ते नाव नाही. हि फोटोतली फुले वेगळी आणि कॉमन आहेत.
सीतेची आसवे असे दोन वेगवेगळ्या फुलांना म्हणतात. एक जांभळट रंगाचे असते त्यावर पांढरा ठिपका असतो आणि दुसरे किटकभक्षी पण आहे. त्यावर चक्क आसवासारखे दिसणारे थेंब असतात. पण तो द्रव म्हणजे किटकांसाठी सापळा असतो.

सीतेची वेणी नावाची एक ऑर्किड पण असते.

शोभाताई माझे माहेरचे आणि सासरचे गाव कोकणात आहे पण मी डोंबिवलीची आहे, इथेच शिक्षण आणि आता राहतेपण इथेच.

माझे माहेर संगमेश्वर तालुक्यात कळंबूशी आणि सासर देवगड तालुक्यात वाडा-फणसे येथे आहे. सुट्टीत कोकणात गेल्यामुळे कोकणची माहिती आहे.

श्रीकांत मस्त टपोर्‍या आहेत स्ट्रॉबेरीज

सान फ्रान्सिस्को ला स्ट्रॉबेरी च्या शेतात मुक्त हस्ताने लुटल्या हो त्या
पुन्हा वर्षभर खायची इच्छा न व्हावी इतक्या खाल्ल्या होत्या...

वरून पेट्या भरून अगदी स्वस्त दरात विकत ही घेतल्या होत्या..

असं आपल्याकडे कोणत्या फळाच्या बाबतीत करता येणं शक्य होईल का?? याचं उत्तर बहुतेक अनिल आणी अर्थातच दिनेश कडे असेल..:)

आपल्या कडे महाबळेश्वर ला स्ट्रॉबेरी चे मळे आहेत. तिथे अस लोकांना स्ट्रॉबेरी वेचायला देण काही लोक करत असतात .

सायली, तो फोटो सीतेच्या आसवांचा नसून ती कानपेट (Commelinaceae family) किंवा केना म्हणून ह्याच फॅमिलीतल्या फुलांचा आहे. सीतेची आसवं म्हणजे Utricularia purpurascens)
ज्यांनी कुणी ती पाटी लिहिली आहे ती थोडी चुकीच्या माहितीची लिहिली आहे. सीतेची आसवं अशीच जांभळ्या रंगाची असतात, शिवाय ही आख्यायिकाही तशीच आहे. पण फुलं मात्रं ती नाहीत. युट्रीक्युलॅरिया या नावाने सर्च केल्यास सीतेची आसवं बघायला मिळतील. Happy

श्रीकांत, काय फ्रेश आहेत स्ट्रॉबेरीज! एक्दम तोंपासु!! मागे अशा खुडण्याबद्द्ल लोकसत्ताच्या शनिवारच्या चतुरंग पुरवणीमधे एक लेख आला होता.

"सीतेची आसवं". नाव जरी करूण असलं तरी हि फुलं पक्की बदमाष आहेत. Happy वाहत्या पाण्याबरोबर येणार्‍या किटकांचे शोषण करणारी. Happy

सितेची आसवं खालील लिंकवर आहेत. Happy
प्रचि १५

http://www.maayboli.com/node/29201?page=1

हो ना, शेतातून घरी जावसच वाटत नव्हत. छान गार हवा होती अन उबदार उन ही होत त्या दिवशी. पोटभर स्ट्रॉबेरी खाल्या. सध्या वेगवेगळ्या बेरीज माझ्या घरा जवळच भरणार्‍या शनीवार च्या बाजारात येउ लागल्या आहेत. चाखून बघायला हव्या.

अवांतर: मी आधी दिलेल्या लिंक मधल्या लेखनात भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा उल्लेख आहे. तिथे त्यांच्या नावाला क्लिक केलत तर तुम्हाला त्यांचा १८८५ मधला एक दुर्मिळ फोटो बघायला मिळेल.

खाली दिसतय त्या लाइप्झिग इथल्या बॅटल ऑफ नेशन्स स्मारका च्या सर्वात उंच टोकावर आपल्याला जाता येत.

मी इथे आलो तेव्हा हिवाळा नुकताच संपला होता. माझ्या समोरच सृष्टीच रूप कस बदलल याची कल्पना तुम्हाला मी या स्मारकाच्या उंच टोकावर जाउन काढलेल्या या दोन फोटोंवरून येइल.

वर दिसतय तेच आता अस दिसत

जिप्स्या... लिंक टाकल्याबद्दल्धन्स.. पुन्हा एकदा अमेझिंग फुलं पाहायला मिळाली..

श्रीकांत छान आहेत फोटोज,

सुप्र निगकर्स! कसे आहात?
जिप्सीभौंचं इंद्रधनुष्य (गोल मस्तच!) श्रीकांतचे फोटोही!
पुण्याच्या घरातल्या हायकसच्या झाडातल्या घरट्यातले फिन्च आता अवती भोवती बागडायला लागलेत.
एकूणात आईबाबा आणि ४ पिल्ले असावीत. खूपच धीट आहेत. माझा कॅमेरा नीट नसल्याने फार जवळून काढायला मिळाले असते ते फोटो काढाताच येत नाहीयेत. असो...........इथे नगरात टोंमॅटो ला एक टोमॅटोची जोडी लागलीये. अमांडा ला चांगली १५/२० पिवळी जर्द फुलं!

हो ना, शेतातून घरी जावसच वाटत नव्हत. छान गार हवा होती अन उबदार उन ही होत त्या दिवशी. पोटभर स्ट्रॉबेरी खाल्या. सध्या वेगवेगळ्या बेरीज माझ्या घरा जवळच भरणार्‍या शनीवार च्या बाजारात येउ लागल्या आहेत. चाखून बघायला हव्या

कशाला लिहिलेत हे सगळे... जळले ना मी इथे....

वर सितेची आसव नाव टाकलेल्या फुलांना कानावरून काहीतरी नाव आहे. माझ्या रानफुलांच्या लिंक मध्ये असेल.

अरे ते निव दाखवा काय असते ते.

श्रीकांत बघते नंतर साईट.

राम राम. Happy
अरे ते निव दाखवा काय असते ते.>>>>>>>>..अग, म्हणजेच कदंब. (हे मला दिनेशदांनी सांगितले होते):स्मित:
हे बघ. (आंतर्जालावरून साभार. )
9FD4A73604771E552AD5B65893E2B57861808C093D79A63CD13D58F1525CF2BFF6958236E631CBFC.file_.jpg

अस होय. मला नव्हत सांगितल Lol

आमच्या दारात आता छान प्राजक्ताचा सडा पडतो. रात्री सुंदर वास दरवळत असतो. पण हल्ली मला फोटो काढायला फुरसतच नसते सकाळी, संध्याकाळी.

दिनेश दा, धन्यवाद. अन्यथा ही चुकीची च फुलं माझ्या स्मरणात राहिली असती.

जिप्सी, लिंक शेयर केल्या बद्दल मना पासुन आभार. खुप तर्‍ह तर्‍हेची फुलं बघायला मिळाली.
या पुर्वी कधीच नावं सुद्धा ऐकली नव्ह्ती, फोटो तर दुरच.

शांकली, धन्यवाद, तुम्हा सगळ्यांमुळे नविन माहिती कळली.

अस होय. मला नव्हत सांगितल>>>>>>>>>>>>>ते तज्ञ व्यक्तींना नाही सांगत. अज्ञानी व्यक्तीला सांगतात. Lol

हे निव / कदंब कुठे मिळ्तात, नाग्पूरात मी कधी पाहिले नाहीत.दिसायला खुपच गोंडस आहेत, फळ आहे की फुल?

ऊओह.. ,यमुने च्या तीरावरच्या . कदंबाच्या मोठ्ठ्या झाडा वर कृष्ण बसलाय आणी खाली जलक्रीडा करणार्‍या गोपिकां ची वस्त्रं फांद्यांवर लटकताहेत आणी गोपिका ,कृष्णाकडे कपडे परत द्यायची विनंती करताहेत..

कदंबाच्या झाडाचा हाच एक रेफरंस माहीत होता.. आता उत्पलसंघवी जवळ जाऊन पाहिले पाहिजेत कदंबाची फळं

ही वरची फळं पाहून राम्बुतान ची आठवण आली..

कदंब तरूला बांधुनी दोला
उंच खालती झोले
परस्परांनी दिले घेतले
गेले ते दिन गेले..............
कदंबाचा दुसरा अजरामर रेफरन्स.
र्‍हदयनाथांनी म्हटलेलं माझ्या प्रचंड आवडीचं गाणं!

हल्ली ऑफिसवर येताना खुप प्रसन्न वाटत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला छान रानफुले फुललेली आहेत. त्यात कुर्डू, एरडा, कवळा, रानतीळ, रानभेंडी अजुन खुप प्रकार आहेत. २ वर्षांपुर्वी सगळ्यांचे फोटो काढलेले आहेतच.

कदंबाचा दुसरा अजरामर रेफरन्स.>>>> मानुषी खरचं, कदंब म्हटलं की हेच गाणं आठवतं मला.
आणि दुसरं कशी काळनागिणी सखे गं वैरीण झाली नदी मधली ओळ 'पैलतटि न का कदंब फुलले......'

गेल्या आठवड्यात मज्जाच झाली. सकाळी ६ वाजता, पुजेसाठी फुले काढत होते. तर खूप गोड शीळ ऐकू आली. म्हटल व्वा! आपल्यासाठी कोण बरे अशी मंजूळ शीळ वाजवतय. Wink म्हणून शोध घेऊ लागले, तर फक्त शीळ ऐकू यायची आणि त्वरीत त्याला प्रतिसादही यायचा. खूप वेळ शोध घेतल्यावर,शेपटीचा एक छोटासा फुललेला पिसारा दिसला. मग लक्षात आले, हा पिसारा आधी पण कधीतरी पाहिलाय. आणि चक्क मला आठवलं. काही दिवसांपूर्वी, खोडकर कावळ्यावर हल्ला करताना असाच (पण याच्यापेक्षा मोठा, आणि क्रोध प्रगट करणारा) पिसारा बुलबुलाने फुलवला होता. अच्छा! म्हणजे हा बुलबुल आहे तर. आता माझी पहाट याच्या शिट्यांनी उगवते. काही दिवसांपूर्वी ती कुहू, कुहू ने उगवायची. Happy

इति श्री बुलबुल पुराणे, पिसारा खंडे, शीळोध्याया समाप्तः Proud

Pages