कलियुग

Submitted by अनिल आठलेकर on 22 June, 2013 - 15:22

मोठे मोठे स्वतःस म्हणती, प्रश्न वेगळा
लहानास पण तुच्छ कुणी का लेखावे हो.............?

उदंड आता भुतासारखी संतमंडळी
वैराग्यच हे की भोंगळ वर देखावे हो.................?

खुशाल फिरती वेड पांघरून चोर गोजिरे
कसे कुणाशी विश्वासाने वागावे हो..........?

अगतिक जीवन जगण्याचे जर कुणी ठरविले
परमेशाने पुन्हा पुन्हा का जन्मावे हो...........?

--अनिल आठलेकर, पुणे

Group content visibility: 
Public - accessible to all site users