वगैरे......

Submitted by आनंद पेंढारकर on 22 June, 2013 - 08:11

कुठे मागतो मी खुलासा वगैरे ?
नको देत जाऊ दिलासा वगैरे

कटाक्षात एका तुझे डाव सारे
कशाला हवा द्यूत, फासा वगैरे ?

जुना हात, एकांत अन पावसाळा
पुन्हा वाटतो कां हवासा वगैरे ?

कधी रंग हो ना पुन्हा तो अबोली
कधी सोनचाफा जरासा वगैरे

तुझा दोष नाही, मला शाप आहे
सदा हुंदका वा उसासा वगैरे

नको सर्व नाती शहाणीच मागू
कुणी सोबती घे खुळासा वगैरे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कटाक्षात एका तुझे डाव सारे
कशाला हवा द्यूत, फासा वगैरे ?
.
जुना हात, एकांत अन पावसाळा
पुन्हा वाटतो कां हवासा वगैरे ?

चांगले शेर.

छानय्त शेर

म ला सर्वाधिक आवडला तो ....

जुना हात, एकांत अन पावसाळा
पुन्हा वाटतो कां हवासा वगैरे ? << मस्तच्चय

पण् सर्व शेरांमध्ये रदीफ "वगैरे: ही चपखल बसत नाही असे माझे मत आहे रदीफ बदलून हीच गझल करता येईल का बघाल का (जमल्यास !!.. कारण माझ्या मते हे बरेच अवघड काम आहे सगळ्या शेराना लागू पडेल अशी रदीफ गझल करून झाल्यावर नव्याने शोधायची म्हण्जे मला अवघड वाटते ...असो!!!)

सोनचाफा सा जरासा<< "सा" चुकून टाईप केलेत बहुतेक