इ मेजवानी - भाग ३

Submitted by दिनेश. on 22 June, 2013 - 08:07

बरेच दिवस झाले ना, जेवायला आला नाहीत ते. या पानं मांडलीत.

हा आहे चीज + बेसिल + गार्लिक टोस्ट आणि चहा

चीज पराठा

छोले आणि राय पराठा

आफ्रिकन खासियत, फ्राईड कसावा

मूली पराठा ( सुलेखाच्या पद्धतीने), घडीसाठी केनयन खिमा चपाती बघा. )

स्पॅनिश राईस

मकई पालक

पीच नेक्टर + पेअर + बेरीज योगर्ट + गावा जेली + क्रीम

सेकंड हेल्पिंग

स्ट्रॉबेरी विथ क्रीम

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळे आलात, जेवलात.. आता कसं, बरं वाटलं.

वर्षू, एक वर्षू स्पेशल डिश राहिलीय.. या आठवड्यात बोलावतोच परत Happy

आजच्या मुख्य बातम्या:

मायबोलीकर दिनेश दा यांनी पुन्हा एकदा मायबोलीकरांवर भयंकर अत्याचार केला आहे. तब्बल तिसर्यांदा वॉर्निंग दिलेली असताना असे कृत्य केलेले आहे.. नोकरीचाकरी निमित्ताने घराबाहेर राहणार्या असंख्य मायबोलीकरांच्या पोटामधे कावळ्यांना डिवचले आहे.... या त्यांच्या कृत्यांचा कडक शब्दात निषेध व्यक्त करत आहे... कॅमेरामन वैभव आहिरे सोबत मी उदय इनामदार .. फुकटची बातमी ..दुसर्यांचे मत.. पाहत रहा..कायबीएन डोंबलाचे मत... Biggrin

अंकु, कसावा हे एक मूळ असते. आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील अनेक लोकांचे ते मुख्य अन्न आहे.
माझ्या विठाई सिरीजमधे, सविस्तर माहिती आहे.

उदयन... घाबरलो ना मी ! पण आता सरावलो पण Happy

दिनेशदा ...जवाब नही...सेकंड हेल्पिंग, प्रचंड टेम्प्टींग...क्रुती द्या प्लिज!!!!!
बेरीज योगर्ट + गावा जेली ???

उदय Lol गुड १

दिनेश दा.. कोणती रेस्पी राहीलीये???????

तुमचे पराठे फारच खुसखुशीत दिसतात ऑल्वेज महा टेंप्टिंग!!!!!!!

श्रद्धा,
बेरीज योगर्ट तयार मिळते, आणि गावा जेली पण. आपल्याकडे पण गोव्याला गावा चीज या नावाने मिळते. पेरू शिजवून, त्यातल्या बिया काढून त्या गरात साखर घालून आटवलेले असते.

वर्षू.. माझ्याकडून राहिलीय.

दिनेशदा, दोनतीन दिवस जालाबाहेर होते, उपासाचे पारणे फिटले. सगळेच प्रचि यम्मी,
आफ्रिकन कसावा, पीच नेक्टर आणि सेकंड हेल्पिंग या परप्रांतियांचे फोटो विशेष नयनसुखद Happy

दिनेशदा
स्पॅनिश राईसच्या चवीची कल्पना नाही. पण इतर फोटो सगळे तोंपासू आहेत.
एकच शंका..पराठे चौकोनी का सगळेच ?

अवल, नक्की !
किरण... राय पराठा त्रिकोणी आहे.
चौकोनी पराठा एक (चीज) थापून केलाय तर एक (मूली) घडी घालून. थापताना नवोदीत कॅमेरामन कशी दोन्ही हाताची चौकट करुन फ्रेम करतो, तसे केलेय.

दिनेशदा, अहाहा काय मस्त मेजवानी आहे. मला ज्याम आवडते. धन्यवाद! Happy

वर्षूताई, इथे इंग्लंडमध्ये चिनी उपाहारगृहांत खाद्यावलीवर (मेन्यूकार्ड) पदार्थाचा क्रमांक टाकतात. चीनमध्ये देखील असेच करतात हे पाहून मौज वाटली. आम्ही ऑर्डर (सॉरी, नो मराटी सिनोनिम!) देतांना नेहमी आकडा सांगतो. शब्दांत कधीच देत नाही. टेबलावर काहीतरी भलतंच उगवण्याची शक्यता असते. Lol

आ.न.,
-गा.पै.

गापै,'' टेबलावर काहीतरी भलतंच उगवण्याची शक्यता असते"...... अगदी!!अगदी!!!!

हेच कारण असेल मेन्यु ला नंबर देण्यामागे.. आपण कितीही जीव तोडून उच्चार केले या खाद्यपदार्थांचे (चायनीज नांवे अर्थातच, इंग्लिश नावं कुणालाच माहीत नसतात इथे) तरी आपल्या आणी त्यांच्या उच्चारांत जमीन अस्मानाचं अंतर.. म्हणून ही सोप्पी युक्ती..

घरी मेड करता ही मी हीच युक्ती वापरते..डाळींना क्रमांक दिलेत, तर मसाल्यांना ए बी सी डी... लाईफ इज सो मच पीसफुल.. Lol

Pages