साग लाकुड क्युबिक फुट ( घन फुट ) कसे मोजतात ?

Submitted by दादाश्री on 22 June, 2013 - 02:20

मला सागवान लाकुड कुबिक फुटात मोजायचे आहे. जुन्या घराच्या तुळया एकुण लांबी १८५ फुट आणि ७इंच * ६इंच आहे तर याचे घनफुट किती होइल. जाणकारांनी मदत करावी.
१८५ फुट लांबी , ७ इंच * ६ इंच = ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका एककात करण्यासाठी
१ फूट = १२ इंच

इंचाचे फूटात करण्यासाठी र/१२ करा

म्हणजेच ६ इंच =६/१२= ०.५ फूट

मग गुणा

काहीही एकेक धागे काढतात.
गुगल वगैरे हाताशी असताना असले धागे काढोन उत्तराची वाट बघत बसणार्‍यांची मानसिकताच समजत नाही मला :रागः

गुगल वगैरे हाताशी असताना असले धागे काढोन उत्तराची वाट बघत बसणार्‍यांची मानसिकताच समजत नाही मला

आपला राग स्वाभाविक आहे, मलाही सुरवातीला आला होता

मात्र व्यवहारातल्या काही मापनाबद्दल गुगलही स्पष्टपणे सांगू शकणार नाही
जस कि
१ ब्रास वाळू = १०० घनफूट
पण हेच माप मी फरशीसाठी वापरले तर
१ ब्रास फरशी = १०० चौ फूट
पण १ ब्रास वीट बांधकाम म्हणजे या दोन्हीमधल काहीच नाही
ते म्हणजे १०० चौ फूटावर केलेले बाहेरील (साधारण १० फूट उंचीपर्यें_) बांधकाम

असो

१ क्युबिक फुट = १७२८ क्युबिक इंच
१८५ फुट (१२ * १८५ = २२२० इंच)

२२०० * ६ *७ = ९३२४० क्युबिक इंच
९३२४० / १७२८ = ५३.९५ क्युबिक फुट

मानसी क वैद्य तुम्ही नका हो जिवाला जास्त त्रास करुन घेउ या अश्या प्रतिक्रिया देण्या पेक्षा पाहु नका आसले धागे, आम्ही आजुन शिकत आहोत अन आडलो कि आमच्या म्,आ बो मित्राना त्रास देनार ते ही मोठ्या मनान खुलासा करतात वेळात वेळ काढुन .
प्रश्नावरुन मानसिकता जोखुनका त्याचा उपयोग नाही आयुष्यात , मात्र या गुणोत्तराचा उपयोग होइल लोकांना.
मिरा पाटिल, किरण कुमार,उपेंन्द्र >> अगदी मनःपुर्वक धन्यवाद ! आणि जाहिर माफी माझ्यामुळे त्रासलेल्यांना Happy
(कधी कधी मला माबोकरांच्या सल्ल्या शिवाय नाही करवत एखादा व्यवहार एवढा ठाम विश्वास आहे आपल्या माणसांवर ) र च्या क ने व्यापारी किलो वर घेणार होता लाकुड. गुगल देव घनफुटा पर्यंत घेउन गेले अन तिथ घोड आडल मराठीत.

मानसी क वगैरे कोटी करुन तुम्ही तुमची मानसिकता दाख्वून दिली आहे
असो.... इतके पर्सनली घेउ नका.... माझी ती पोस्ट फक्त तुम्हालाच नाही तर असे निरर्थक धागे उघडणार्‍या अनेकांना उद्देशून होती!
वाचू नका वगैरे म्हणणे ठीक आहे पण त्यामुळे खरच जे वाचण्यासारखे असते ते कुठेतरी मागच्या पानंवर जाउन पडलेले असते.
माबोवरच्या मित्रांचा सल्ला नेहमीच उपयोगी असतो त्याबद्दल वादच नाही पण एखादा फॉर्म्युला विचारण्यासाठी धागा म्हणजे जरा अतीच होतय अस नाही वाटत का तुम्हाला? २+२ करण्यासाठी कॅल्क्युलेटर वापरण्यासारखे आहे हे.... पटल तर विचार करा नाहीतर तुमची मर्जी Proud