chid :राग:

Submitted by रोहितगद्रे१ on 20 June, 2013 - 06:35

कसं म्हणून सांगायचं
काय म्हणून सांगायचं
तेच ते तेच हातचं
राखून सारं बोलायचं

बोलीन म्हटलं रोकठोक
करीन जरा ठोकठोक
आणलं उसनं अवसान उरी
त्याचं पडून झालं भोकभोक

बोल तयांचे बरे बोलावे
आपुले ओठ न खोलावे
वाटणे कुटावे चूर्ण करावे
आपले विचारच पचवावे

मुकाट मुक्याने ऐकावे
पिसाट तुक्याने वंदावे
सहजी हे न जमे तयांनी
बहिरे होऊन वागावे

Group content visibility: 
Public - accessible to all site users