मुंबई - पुणे- मुंबई

Submitted by वेडसह्याद्रीचे on 19 June, 2013 - 08:05

मुंबई - पुणे- मुंबई सारखीच
माझी स्टोरी घडावी
हाती कागदी तुकडा घेऊन
पत्ता शोधीत घरी ती यावी

असता घरा बाहेर मी
नजर भेट तिची व्हावी
पत्ता विचारून मला
घर शोधावा ती निघून जावी .

न भेटाव घर तिला
फिरून माघारी ती यावी
भेट तिची माझी
पुन्हा योगायोगानेच घडावी .

बोलावी चार क्षण
अन क्षणात मैत्री घट्ट व्हावी
बोलता बोलता मामलेदाराची
चविष्ट मिसळ तिच्या सोबत खावी .

फिरावं अस काय आहे तुमच्या ठाण्यात ?
नाक मुरडत तिने म्हणावं
उत्तर म्हणून , काय नाही आमुच्या ठाण्यात
अस अभिमानाने मी बोलाव

घेऊन जाता तिला , तलावपाळी फिरवावी
रांगेत उभे राहून एकदा बोटिंग करून घ्यावी
कोपिनेश्वर मंदिर कुठेय ?कानी अलगद तिने म्हणावं
देवळात तिज सोबत जाउन, देव दर्शन करून घ्याव .

मार्केट मधील दुकानामधून
तिला विंडो शोप्पिंग घडवावी
काय हवे नको ह्याची
विचारपूस मी करावी .

शेवटी शेवटी मात्र
मी तिला प्रपोज करावं
घराचा पत्ता शोधत होतीस
तो मीच अस सांगाव .

हा बघ इथे उभा आहे
लग्न करशील माझ्याशी ?अस मी म्हणावं
लाजता लाजता तिने
हो ला हो म्हणावं

मुंबई - पुणे- मुंबई सारखीच
अशी माझी स्टोरी घडावी
पुणे वाली ना सही मालवणी
बायको मिळावी ............. Happy :):

संकेत पाटेकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<पुणे वाली ना सही मालवणी
बायको मिळावी ............>>

भारी रे.. जबरदस्त.. मालवनी येता मा तुका.. नायतर नंतर भाषेचो प्रोब्लेम होयत..