लग्नापूर्वीचा सल्ला

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 18 June, 2013 - 11:00

मने जुळल्याविना यारो
लग्न कधी करू नका
यात आपल्या आईबापांचे
मुळीसुद्धा ऐकू नका

घर गाडी बंगला त्याचा
भला थोरला असू द्या
वागणे बोलणे दिसणे
कितीही मनी भरू द्या

वर्ष दोन वर्षात त्याचा
सारा रंग उडून जाईल
आज हवा हवासा संग
मग नको नकोसा होईल

उणेदूणे काढता काढता
दिवस जातील उलटून
जीवनपुष्प सुगंधित
जाईल अकाली सुकून

ग्रंथ गाणी कविता काही
जागा फिरणे खाणे काही
नाटक सिनेमा मित्र वा
झूलॉजीतील किडेबिडेही

असे काही सूर जुळावे
जीवनगाणे एक व्हावे
रंगा मध्ये रंग मिळावे
इंद्रधनुष्य सदा फुलावे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद ,साधनाजी वैभवजी,किरणजी ,पियुजी .
किरणजी ,<<<मांडणी आणखी चांगली होउ शकते>>>> आवश्य प्रयत्न करीन .धन्यवाद