अरे माझ्या मना...

Submitted by टिमी on 18 June, 2013 - 07:17

अरे माझ्या मना...
का असा उदास तू?
पावसाने अंग चिंब
कसा राहिलास कोरडा तू?

नको आळवू गीत
सूर येती दु:खाचे
नको दु:खाच्या सहाणेवर
चंदन भूतकाळाचे

लाड तूझेही खुप झाले
आठव त्या आनंद्सरी
वाट पहाती तुझ्या नजरेची
किरणे उगवत्या सुर्याची

दूर होईल मळभ सारे
कर थोडेसे चिंतन
संयमाचा एक घुटका...
अन बरसेल आनंदघन

तुझा सारा गढुळपणा
तुलाच निवळायला हवा
साद घाल स्वतःला
प्रतिसादही तूच द्यायला हवा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users