नमो नमः

Submitted by विजय देशमुख on 18 June, 2013 - 03:50

शेवटी मोदी आले.... कित्येक दिवस सगळे ज्याची वाट पहात होते, ते घडले. मोदींना निवडणुक प्रचाराचे प्रमुख करण्यात आले. अडवाणींनी अडवणुक करण्याचा प्रयत्न केला, काहींना रुसवा धरला, पण शेवटी मोदींना थांबवेल असं सध्यातरी कोणीच दिसत नाही.

गुजरातमधील भरभराट, विकास, हाच मोदींचा अजेंडा असेल, अशी अपेक्षा आहे. पुढील ५ वर्षात गुजरातच्या धर्तीवर भारताचाही विकास व्हावा हीच सदीच्छा.

{बाकी ते गोध्रा, एककल्लीपणा, मीच एक तो ग्रेट, याम्चेशी काय घेणे-देणे. विकास महत्वाचा}.

जाता जाता :- रुपयाची घसवणुक ताळावी म्हणुन रिझर्व बँकेने व्याजदरात कपात करावी अशी (धमकीवजा) विनंती पी. चिदंबरम यांनी केली होती, ती फेटाळत व्याजदर कायम ठेवत, सुब्बाराव यांनी सरकारने काय करावे हे सुचवले आहे. जगप्रसिद्ध अर्थमंत्री आज पंतप्रधान असुन काय उपयोग, असं नाईलाजाने म्हणावं लागत. त्यामुळे मोदींच्या वेगवान प्रशासनाची भुरळ आहेच. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

न.मो. = नरेंद्र मोदी

नमः = नमस्कार.... खर तर त्यांच्यासमोर लोटांगणच घाला, असं त्यांचे समर्थक म्हणतात Happy

ओह!
अरे देवा Proud
मला वाटलं फार तर फार त्यांच्या पक्षाचा मंत्र वगैरे असेल.. पण हे तर विचित्रच काही तरी आहे Proud
मंत्र असता तरी संबंध काय हे शोधत बसलेच असते मी...

कोणत्याच राजकारण्यांचा काही नेम नाही.

माझ्या मते या निवडणुकीत anti incumbency factor फार महत्त्वाचा ठरणार आहे . भाजप मोदीना ''विकासपुरूष" Project करून त्याचाच फायदा उठवू पाहतय

रुपयाची घसवणुक ताळावी म्हणुन रिझर्व बँकेने व्याजदरात कपात करावी अशी (धमकीवजा) विनंती पी. चिदंबरम यांनी केली होती, <<

रुपया आणि काँग्रेसची इज्जत यांच्यात रोज नवी नवी खालची पातळी गाठण्याची स्पर्धा लागली आहे.
-- इति नमो
खरी गोष्ट आहे.

मी भास्कर +१०००

मोदी गुजराथी असल्याने रुपया खाली वर होणे म्हणजे नेमकं काय, ते चांगलच जाणुन आहे, त्यामानाने राजपुत्रांचं ज्ञान... काय बोलावं. त्यामुळे ते रुपयाला तारतील किंवा उर्जेच्या बाबतीत स्वयंपुर्ण करतील (जसं गुजराथमध्ये केलं - सौरउर्जा प्रकल्प आणि सरदार सरोवर?). त्यामुळे तेलाची आयात कमी होईल आणि किमान महागाईला थोडातरी अंकुश बसेल.

पण सामान्य लोक तर खुश आहेत. व्यवसाय वाढवायचा म्हणजे हे सगळे करणे आलेच. त्याशिवाय प्रगती नाही आणि प्रगती झाली की हा घाटाही भरुन निघेल. बाकी कधीकधी अश्या सवलती द्याव्या लागतात Sad

किमान त्यात घोटाळा तर नाही ना !