निर्मिक

Submitted by संदीपसमीप on 17 June, 2013 - 07:26

मी आपण म्हणणार नाही...
मला माझ्या मी पणाचा जितका माज आहे
तितकाच तुमच्या माजाविषयी आदरसुद्धा...

मी निर्मिक आहे.
मी विधाता.
मी मानव.
मी स्वप्न आहे.

माझ्या मर्यादा आहेत या वर्तुळाच्या परिघात सामावलेल्या.
असोत.
मी वर्तुळाचा मिंधा नाही.

हा फक्त एक प्रवास.
एक चक्र.
दोन टोकांमधे आपले स्वयंपूर्ण अस्तित्व बाळगणा-या शून्याकडचा प्रवास.

आतले सर्व माझे.
बाहेरचे माझे शब्द.

शब्दांच्या निरर्थकतेत ओथंबणारे अर्थ.
माझे काही नाही.

मी निर्मिक. मी विधाता. मी मानव. मी स्वप्न.

यास सुरुवात असावी कदाचित.
यास अंत मात्र नाही.
आरंभबिंदूची उकल कधी झालीच तर,
अंताचा आदमासही लागावा कदाचित.

असोत.

प्रश्नचिन्हांचे ओझे बाळगण्यात स्वारस्य नसलेले सारे क्षण
पुढे प्रश्नचिन्हाखालचा ठिपका बनतात.
अडकलेल्या काट्यास एक जीव बहाल करतात.
त्या स्रुजनास माझा ना नकार ना होकार.

मी एक ठिपका.
आरंभबिंदू.
माझ्या पोटात अंताची किल्ली.
तरी हे वर्तुळ माझे मिंधे नाही.

मी निर्मिक. मी विधाता. मी मानव. मी स्वप्न.

असोत.

-संदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निर्मिक ही संज्ञा विधाताच्या जोडीने पाहून मौज वाटली. एक श्री लळीत म्हणून सद्गृहस्थ आहे त्यांच्या प्रबंधाचा विषय होता निर्मिक. एक पुस्तक ही आहे शोध निर्मिकाचा...