गोरी बायको कश्यासाठी ?

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 17 June, 2013 - 03:59

गोरी बायको कश्यासाठी ?
लोकांनी पाह्ण्यासाठी
आपल्यावर जळण्यासाठी
त्यांना जळतांना पाहून
आपण खुश होण्यासाठी .
गोरी बायको कश्यासाठी ?
समारंभी मिरवण्यासाठी
गर्दीत सांभाळण्यासाठी
सांभाळतांना तिला तसे
गर्दीत हिरो ठरण्यासाठी
गोरी बायको कश्यासाठी ?
गोरी पोर होण्यासाठी
कष्ट त्यांच्या लग्नाचे
आपोआप टाळण्यासाठी
गोरी बायको कश्यासाठी ?
कुणा विसरून जाण्यासाठी
तुझ्याहून सुंदर गोरी ...
असे काही जिरवण्यासाठी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली !!
___________________________-

नानाsssssss ....:हहगलो:

कवितेत एकच बाजू आलीय. गोरी(च) बायको का नको ? यावरही एक कविता होईल.

डॉ. विक्रांतजी, श्री. तुषार जोशीं यांचा सावळ्या मुलीच्या कविता हा एक अल्बम प्रकाशित झालेला आहे. त्यात त्यांनी हा विषय वेगवेगळ्या कवितांतून अतिशय सुंदररित्या हाताळला आहे. शीर्षक पाहून माझ्याकडून मिस्कील प्रतिसाद दिला गेला खरा पण गो-या रंगाचा आग्रह म्हणजेच रंगाला प्राधान्य या आपल्याला मांडायच्या आशयाकडे दुर्लक्ष झालं याबद्दल क्षमस्व !

गोरा(च) रंग हवा या विचारांचा सर्वाधिक प्रसार ज्या बॉलिवूडमुळे होतो तिथेच नंदीता दास आणि चित्रांगदा सिंग सावळेपणाशी तडजोड करायची गरज नाही अशी आत्मविश्वासपूर्वक भूमिका घेताना दिसतात. जिथे अगदीच नाईलाज झाला तिथेच रंगरंगोटी केलीय. रंगापेक्षा हा आत्मविश्वास खूप महत्वाचा वाटतो.

<< तिथेच नंदीता दास आणि चित्रांगदा सिंग सावळेपणाशी तडजोड करायची गरज नाही >> महाभारतातल्या द्रौपदी, रुक्मिणी पासून बॉलीवूडच्या वहिदा रेहमान, नूतन पर्यंत तसे अनेक दाखले आहेत. पण 'गोरी गोरी पान, फुलासारखी छान' पासून हा 'वर्ण'भेद अधिकच जोमाने वाढत गेला असावा ! Wink आतां कॉस्मेटिक्सच्या जाहिरातीत 'उजळ' हा पर्यायी शब्द वापरायचीही आयडीया निघालीय ! असो, सौंदर्याच्या प्रत्येकाच्या कल्पना भिन्न असूं शकतात !

गोरी बायको कशासाठी हवी? हे सांगण्यासाठी हा सगळा प्रपंच आहे होय?
शीर्षक बघून मला असे वाटले की, गोरी बायको नसली तरी काही फरक पडत नाही अश्या आशयाची कविता आहे.

मित्रांनो ,गोरी बायको अथवा याच अर्थाने देखणा नवरा ,हे आपल्या जन मानसात अगदी खोलवर जावून बसलेले ताकाचे भांडेच आहे .गो-या रंगाचा आग्रह धरणाऱ्याचा खर तर हा उपहास आहे.

इश्श जी ,
खरतर गोरी बायको नसली तरी काही फरक पडत नाही अश्या आशयाचीच हि कविता आहे.

सर्वांचे आभार .

खरतर गोरी बायको नसली तरी काही फरक पडत नाही अश्या आशयाचीच हि कविता आहे. >> अस्सं आहे होय? पण तुम्हाला जे म्हणायचं आहे ते तर कवितेतून नीट पोचतच नाहिये, किंवा मग आम्हीच अल्पमती असू.... असो...

विक्रांत,

बरं बरं.

पण खरं सांगु का? कविता उपहासात्मक वाटत नाहिये...असे माझे मत.
बाकी चालु द्या.

दक्षिणाजी ,ईश्यजी ,
छे छे,,कविता वाचणारे कधीच अल्पमती नसता,,,sorry कविता न पोह्चल्याबद्द्ल .
बऱ्याचदा आपण आपल्याला गृहीत धरतो .आपल्या कविते सकट ....

आयला तुम्ही Congress चे का हो??

सगळे जी जी जी झालेत म्हणून म्हट्लं
मधुराजी
बेफिकीरजी
ईश्यजी
दक्षिणाजी

......दिवे तर घ्याच घ्या!! Happy

<<<<<<आयला तुम्ही Congress चे का हो??
सगळे जी जी जी झालेत म्हणून म्हट्लं >>>

उत्तर -- ना ना जी

पण तुम्ही प्रथमच भेटला फार आनंद वाटला जी !

कविता बोअर आहे.>>>>>ज्याची त्याची अभिरुची ! आपल्याला धन्यवाद .
bye the way ज्ञानेश आपल्या नावातच ज्ञानेश मध्ये एवढा गोडवा आहे की आडनाव भिस्कूटे असले तरी चालले असते .सहजच एक प्रश्न , नवे आडनाव बायकोचे आहे कि काय ? तसे असेल तर प्रथा चांगली आहे .

गौरांगी, काळांगी, सावळांगी, गव्हाळांगी या पैकी गौरांगी नाव लै बघितले आहे, मग बाकीचे रंग अस्पृश्य आहेत काय?

बंगाली लोक ठेवतात ,काली, कालिका श्यामला .आपल्या कडील कृष्णा तसेच .पण त्यांना divine touch आहे .पण मुळात आम्ही गोर्‍याचे लाचार लाळघोटे आहोत .

रंगाने गोर्‍या म्हणाल तर १९४७ पूर्वी फक्त त्या 'फिरंग्या'च होत्या. आता कुठे आहे गोरा रंग?????

आता भारतात सर्वत्र मिळतो तो रंग गोरा नाहीच्चेय!

समदे गव्हाळे किंवा काळेच की हो!!

फरक एवढाच की

फिक्कट काळे, मध्यम काळे, डार्क काळे, कावळ्यासारखे काळे, कोळशासारखे काळे वगैरे वगैरे............

Happy Happy Happy

ंमूळ मुद्दा - गोरी बायको नसली तरी काही फरक. पडत नाही असा आहे हे कविने स्पष्ट केले आहे मात्र गो-या बायकोचे फायदे सांगण्यास कविता लिहीली आहे.
पण शेवटी काळी काय आणि गोरी काय
बत्ती बुझाओ और ................... .................
Happy

कविता बोअर आहे.>>>>>ज्याची त्याची अभिरुची !

?????

हो ? ??

विक्रांत जी ,

एक तर कविता टुकार . त्यातुन आभार फ़ार !!

खरं बोललं कुणी तर अभिरुची काढणार ?

Pages