बाप....

Submitted by विनार्च on 17 June, 2013 - 01:22

फार पूर्वी नाही अलिकडेच
माझंही एक घर होतं
जिथ रहायला माझा बाप होता
सगळीकडे असतो तसाच
आमच्यातपण जनरेशन गॅप होता
छोटी मोठी भांडण होती
पण डोक्याला कसलाच ताप नव्हता
कारण काही झाल तरी
माझ्यामागे माझा बाप होता
दिवसभर कितीही भांडला तरी
रात्री मायेने डोक्यावर हात फिरवायचा
अगदी गाढ झोपेतही
त्याच्या प्रेमाचा ओलावा जाणवायचा
त्याच्यापेक्षा वेगळ व्हायच होत मला
म्हणून त्याचे सगळे नियम
मी बेदरकारीने मोडत होते
त्याने माझ्यासाठी निवडलेले पर्याय
मी बंड करुन सोडत होते
पण तरीही माझ्या आयुष्यावर
त्याचा वेगळाच एक छाप होता
छोटी मोठी भांडण होती
पण डोक्याला कसलाच ताप नव्हता
कारण माझंही एक घर होतं
जिथं रहायला माझा बाप होता
तो गेला..... अन त्याच्यासोबत
माझ्या घराच घरपण सरल
काल जिथे घर होतं
तिथे फक्त वेटिंगरुम उरल......

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रियाला अनुमोदन!!!
मस्तच!!!!!!!!!!

आवडली

आई कुठे आहे? ती असली तर वेटिंग रूम नाही होणार.>>>>बरोबर.
बाबांची आठवण आली.
आवडली.