जाहले घासून माझे दात आता (हझल)

Submitted by सुशांत खुरसाले on 16 June, 2013 - 00:11

जाहले घासून माझे दात आता
गढुळ पाणी प्यायचे जोशात आता !

रोज होते बोंब की मी सूर्यवंशी..
'ऊठ मेल्या वाजले की सात आता!'

स्नान करण्याचे भले येते जिवावर
आळशी माझ्या मनाची जात आता

दात देवा घासुनी तैयार हो तू..
बुचकळीतो मी तुला तीर्थात आता !

भाव माझा वाढवावा वाटते पण -
गंडतो मी रोजचा स्वस्तात आता !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Biggrin

रोज होते बोंब की मी सूर्यवंशी..
'ऊठ मेल्या वाजले की सात आता!' ,,, ह हा हा....मस्त

Lol मस्तच की

दुसर्‍या आणि पाच्व्या शेरात रदीफ ची मजा तेवढी आली नाही बघा बाकी हझल भारीच आहे

डॉ.साहेब, अरविंदजी, सुप्रियाताई धन्यवाद!

मतला फार भारी आहे>>
कणखरजी ,आभारी आहे.

शिवमभौ नेहमीपरमाणे थॅंकू...

वैभवजी, दुसरा आणि पाचवा>> काहीसा सहमत..
असो ..प्रामाणिक प्रतिक्रियेबद्दल आभार..

============================
आत्ताच दात घासून झाले ..म्हटलं चला धागा वर काढुया Biggrin

दात देवा घासुनी तैयार हो तू..
बुचकळीतो मी तुला तीर्थात आता !

भाव माझा वाढवावा वाटते पण -
गंडतो मी रोजचा स्वस्तात आता !


Happy जबरी झालेय.

आत्ताच दात घासून झाले ..म्हटलं चला धागा वर काढुया <<<<<<<<

Lol
मीही आताच बादलीभर पाण्यात स्वतःला बुचकळूनी आलो म्हट्ले चला आपणही धागा वर कढूया Lol

शशांकजी ,मुटेसर , उकाका आभारी आहे....

वैभवजी ,डबल आभार !

बाकी आता कोणी स्वस्तात गंडले की काढा हा धागा वर....:फिदी: