तो देव

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 14 June, 2013 - 03:40

तो देव इथे राहतो इथेच जगतो
इथल्या जंगलात शहरात फिरतो
इथल्या नदीत स्नान करतो
इथल्या गावी मागून खातो
म्हणूनच तो मला सदैव
आपला असा वाटतो
दूर दूर कुठे ढगात
खोल गहन सागरात
शोधणे आम्हा शक्य नाही
या माती शिवाय मनाला
अधिक काही माहित नाही
त्याचा बद्दल विचार करता
हृदय भरून येते
आपलेपण उगा दाटते
त्यामुळेच कदाचित
तो भेटण्याची शक्यता हि वाटते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतीताई +१

इथल्या जंगलात शहरात फिरतो
इथल्या नदीत स्नान करतो
इथल्या गावी मागून खातो<<<<<विशेष उल्लेखनीय ओळी

अतीशय मोठे विचार सहज साधेपणाने उतरलेत
आशय-विषयात तुकोबाच्या अभंगासारखी काहीतरी जादू आहे इतके समजते पण नक्की काय आहे ते समजत नाहीये
धन्यवाद या रचनेसाठी मनाला खूप शांत वाटते आहे ही रचना वाचल्यावर

सुंदर विचार आहेत.

मला स्वतःला तुकोबा - ज्ञानोबांमुळे "तो" असण्याची व त्यामुळेच "तो" भेटण्याची शक्यता वाटते ....

बाकी त्याचा तोच जाणे .... Happy

भारतीताई ,वैभव,शशांक, परब्रम्हजी .आपल्या सर्वांचे मनापासून आभार .
शशांक १००% सहमत .