'' तो गेला तेव्हा डोळे बरसत होते "

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 12 June, 2013 - 08:58

आजारी पडल्यावर जन भेटत होते
लाकडे स्मशानी जणू पोचवत होते

तो आला तेव्हा कुठेच पाउस नव्हता
तो गेला तेव्हा डोळे बरसत होते

''सरतील दिवस हे '' मला म्हणाले जीवन
पण कोण न जाणे कुणास फसवत होते

शौर्याची गाथा अशी सजवली त्याने
हृदयाचे ज्याच्या चित्र थरथरत होते

ज्ञानामृत त्यांचे प्राशन केल्यावरती
''कैलास'' म्हणे ''अज्ञान पाजळत होते''

--डॉ.कैलास गायकवाड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजारी पडल्यावर जन भेटत होते
लाकडे स्मशानी जणू पोचवत होते

तो आला तेव्हा कुठेच पाउस नव्हता
तो गेला तेव्हा डोळे बरसत होते

''सरतील दिवस हे '' मला म्हणाले जीवन
पण कोण न जाणे कुणास फसवत होते<<

व्वा! सुंदर शेर आहेत.

तो आला तेव्हा कुठेच पाउस नव्हता
तो गेला तेव्हा डोळे बरसत होते

सुरेख !

''सरतील दिवस हे '' मला म्हणाले जीवन
पण कोण न जाणे कुणास फसवत होते

छान.
गझल आवडली.

''सरतील दिवस हे '' मला म्हणाले जीवन
पण कोण न जाणे कुणास फसवत होते...<< व्वा ! >>

तो आला तेव्हा कुठेच पाउस नव्हता
तो गेला तेव्हा डोळे बरसत होते

छान.

गझलेचा मूड जपायला पाहिजे.
शेवटचा शेर वगळल्यास तो जपला गेलाय असे वाटते.

गझलेचा मूड जपायला पाहिजे.
शेवटचा शेर वगळल्यास तो जपला गेलाय असे वाटते.>>>>>

मनापासून सहमत आहे....

सर्व प्रतिसादकांचे मन:पूर्वक आभार.

वा! सुरेखच!

तो आला तेव्हा कुठेच पाउस नव्हता
तो गेला तेव्हा डोळे बरसत होते

''सरतील दिवस हे '' मला म्हणाले जीवन
पण कोण न जाणे कुणास फसवत होते<<विशेष.

तो गेला तेव्हा डोळे बरसत होते>>यानंतर क्षणभर
'ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता' ची आठवण झाली.