थर्माकोली सत्संग

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 11 June, 2013 - 13:48

शब्द शब्द मी ऐकत होतो
तरीही किती कोरडा होतो
मारून मुटकून भक्ती ती
उगाच गोळा करत होतो ll १ ll
अनुभूतीच्या प्रवाहात ते
चिंब चिंबसे भिजत होते
माझिया मनी ढग वांझोटे
पांढरे तेहि तिथे नव्हते ll २ ll
कुणा दिसे धवल ओंकार
कुणी ऐके नाद अनाहत
माझ्या पाठीस लागुन रग
खाली खडे ही होते टोचत ll ३ ll
बसल्या बसल्या मग उगा
दिवा स्वप्ने ती पाहत होतो
साक्षात्कार गुरुकृपा नि
मठ छानसा बांधत होतो ll ४ ll
नव्हती श्रद्धा तरीही नम्र
नशीबा जणू अजमावत
त्या तयांच्या कृपाप्रवाहात
थर्माकोल तो उगा वाहत ll ५ ll
विक्रांत प्रभाकर
http://vikrantchishodhyatra.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे.

धन्यवाद सुशांत ,
<<,वाईट वाटले की बरे वाटले>>>ज्ञानेशजी प्रणाम, अध्यात्मात वाया काहीच जात नाही असे मला वाटते .त्यामुळे वाईट नाही वाटले .या कवितेत एक अपेक्षा भंग चित्रित केले आहे .