मी एक सामान्य माणूस

Submitted by सचिनकिनरे on 7 June, 2013 - 02:29

मी एक सामान्य माणूस !

मांजरीला कधी आडवा जात नाही,
तिचा दिवस खराब जायचा.

मी एक सामान्य माणूस !
अमावास्येला दारावर लिंबू बांधतो. इडापिडा घरात कधी येत नाही.
मला ती बाहेरच्या बाहेर पिडते.घरात घरातली पिडा पिडते.

मी एक सामान्य माणूस !
अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तोंड उघडतो, तर वाचाच गेलेली असते.
दात ओठ चावायला जातो, तर दात खीळ ही बसते.

मी एक सामान्य माणूस !
कुणीही येऊन मला फसवून जाव.
एक निर्धार मात्र करतो. पुढच्या वेळी तसच फसायचं नाही.
फसविणारा प्रत्येक चेहरा ओळखीचा असतो.
कधीकधी तो माझाच असतो. तरीही मी फसतो.

मी एक सामान्य माणूस !
खिशात पैसे नसले तर, दुकानाकडे बघतही नाही.
खिशात पैसे नसले तर, बायकोकडेही बघत नाही.
एक, वस्तू घ्यायची ताकद नसते म्हणून.
दुसर, तिला वस्तू द्यायची ताकद नसते म्हणून.

मी एक सामान्य माणूस !
माझा अर्धा वेळ, तिला विचारायचं का, हे ठरवण्यात जातो.
उरलेला अर्धा वेळ, तिला कस विचारायचं, हे ठरवण्यात जातो.
त्या आधी तिच्यावर अक्षता पडलेल्या असतात.

मी एक सामान्य माणूस !
साहेबासमोर खालची नजर वर करत नाही.
माझ्या नजरेतले भाव त्याने वाचले तर!
इन्क्रीमेंट जवळ आलेली असते.
पुढच्या प्रमोशन ची साडी ही बायकोला काबुल केलेली असते.
काम नाही झाले तरी चालते नंतर, आत्ता नाही म्हणत नाही.

मी एक सामान्य माणूस !
देवाला भिऊन असतो.चांगले व्हायला हवे.
भुतालाही घाबरतो, वाईट व्हायला नको.

मी एक सामान्य माणूस !
अनेक सामान्य चिंता उरी बाळगून,
काळ्याचे पांढरे, होत्याचे नव्हते करत असतो.
दहा बाय दहा मध्ये, एक महाल सपनोका बनवून,
माझ्या राणी बरोबर, फाटलेल्या विजारीला रफू करून घेत असतो.
माझ्या, आशा, माझी स्वप्न, यांना खच्ची करून मी,
माझ्यासारखच सामान्य बनविलेलं असत.
माझा आकाश, माझ्या घराच्या छपरा प्रमाणेच व्यवस्थित फाटलेलं असता.
माझी दुख ही सामान्याच असतात. त्यांनी असामान्य होणं मला परवडणार नसत.
माझ सामान्य वलय स्वतः भोवती घेऊन,
माझ्या सामान्य जगात जगत असतो,
मी एक सामान्य माणूस !
Sachin Kinare - Jun 4, 2010

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान ..... Happy
माझ्या, आशा, माझी स्वप्न, यांना खच्ची करून मी,
माझ्यासारखच सामान्य बनविलेलं असत.
माझा आकाश, माझ्या घराच्या छपरा प्रमाणेच व्यवस्थित फाटलेलं असता.
माझी दुख ही सामान्याच असतात. त्यांनी असामान्य होणं मला परवडणार नसत.>>>>> ह्या ओळी खूप आवडल्या

माझा आकाश, माझ्या घराच्या छपरा प्रमाणेच व्यवस्थित फाटलेलं असता.>>>> इथे चुकून "असता" झालं आहे का?

सचिन किनरे,

कवितेपेक्षा ललित म्हणून हे खूप आवडले. सगळे पटलेही, बरेचसे! सामान्य माणसाचे असामान्यत्व अधोरेख्त केलेत.

धन्यवाद.

Dhanyavaad.
Mukt chandaat ahe.

Pahili comment barobar ahe. Thoda copy paste check karayache rahun gele.