ब॑धन

Submitted by सचिनकिनरे on 6 June, 2013 - 01:19

नियमात सार्‍या, बांधला गेलो असा
माझा मलाच, पारखा झालो असा

नसण्याची तुझ्या, झाली सवय जरी
चाहुलीला क्षणांच्या, फसुनी गेलो असा

कितीक बंधनांचे , गोफ गुंफले जरी
आपल्यां मधेच, एकटा राहीलो असा

दान माझ्याकड़े , आले सांगु कितींदा
... तुझ्याशिवाय डाव, उधळुनी गेलो असा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे Happy
कितीक बंधनांचे , गोफ गुंफले जरी
आपल्यां मधेच, एकटा राहीलो असा

दान माझ्याकड़े , आले सांगु कितींदा
... तुझ्याशिवाय डाव, उधळुनी गेलो असा

>>>>>>>>>> एकदम सहीए Happy