खाबूगिरी...!!!

Submitted by रोहितगद्रे१ on 5 June, 2013 - 04:53

टुजी थ्रीजी सगळे बीजी
आग आग जळून खाक
शोध शोध कागद शोध
झाली राख शांतता राख

टोवर उंच खूप खूप
उभे राहिले गुप चूप
साहेब सगळे हुप हुप
मिशीला दिसते अजून तूप

बंदूक बंदूक खेळे बाळ
काडतुसाची लपवी माळ
पोलिस पोलिस भाईला ओलिस
चार धपाटे उगाच बालिश

धरण धरण नुसता घात
काकाजींना वरण भात
उस उस मोठ्ठा उस
पाणी पळवा लावून फूस

रस्ता रस्ता मोठ्ठा रस्ता
गाडी ऎटीत धावत असता
धडाक धड गाडी आत
खड्डा पडला चार हात

बाबू साबू सगळे खाबू
तुकडा नाही तर करती भूभू
देश देश ऐसा देश
स्वाभिमानाचा नाही लवलेश

Group content visibility: 
Public - accessible to all site users